यूपीएससी एमपीएससीत यश आले नाहीतर न घाबरता उद्योग क्षेत्रात वळावे- उपायुक्त वाघमारे

मोरे मनोहर
किनाळा :- तीन ते चार वर्षे सतत मेहनत केल्यानंतर यूपीएससी सारख्या परीक्षेत शंभरातून चार ते पाच विद्यार्थी यशस्वी होतात यामुळे 95 टक्के विद्यार्थ्यांनी यूपीएससी एमपीएससी सारख्या परीक्षेत यश आले नाही म्हणून न घाबरता तरुणांनी वेळ वाया न जाऊ देता आपणास जे जमेल त्या उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण घेऊन आपण आपले उद्योग क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी उद्योग क्षेत्राकडे वळावे असे आव्हान उद्योग खात्याचे उपविकास आयुक्त आणि सनदी अधिकारी वैभव वाघमारे यांनी तरुणांना मार्गदर्शन करताना आपले मत व्यक्त केले.

नांदेड येथील आंबेडकर मिशनचे प्रमुख दीपक कदम यांच्या वतीने आंबेडकर मिशन येथे आयोजित करण्यात आलेल्या यशस्वी उद्योजकांचा सन्मान आणि उद्योजक प्रशिक्षण परिषद दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता उद्योग खात्याचे उपविकास आयुक्त आणि सनदी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आले होते यावेळी यशस्वी उद्योजकांचा वैभव वाघमारे यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.
आंबेडकर मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी सरकारी नोकरीचे कमी झालेले प्रमाण यामुळे अनेक सुशिक्षित युवा तरुणांसमोर उद्योग उभारण्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात घेऊन पीएम योजना, सीएम योजनेचा लाभ घेऊन तरुणांनी पुढे आले पाहिजे हा दूरदृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून आंबेडकर मिशनमध्ये यशस्वी उद्योजकांचा सन्मान आणि उद्योजक प्रशिक्षण परिषदेचे आयोजन केले होते.
यावेळी यशस्वी उद्योजक म्हणून आर के सिंग बुलंदशहर मार्शल उद्योग, सी.आर.सांगलीकर, बालाजी कंठेवाड, मारुती कंठेवाड, प्रकाश नगारे, अशोक जोंधळे, माधव डोम्पले, मधुकर गच्चे, सूर्यकांत गादेवार सावकार, स्वप्निल नरबाग, प्रदीप वाघमारे, भगवान धबडगे, गौतम कांबळे, देविदास रंगदल, प्रसनजीत वाघमारे, प्रशिक चित्ते, शिवराज टोम्पे आधीसह यशस्वी उद्योजकांचा सन्मान वैभव वाघमारे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
याप्रसंगी वैभव वाघमारे पुढे बोलताना म्हणाले की नोकरी वाईट नाही परंतु ती प्रत्येकालाच मिळत नाही यासाठी तरुणांनी निराश न होता आपले करियर घडवण्यासाठी पीएम योजना आणि सीएम योजनेच्या माध्यमातून उद्योग व्यवसात उतरले पाहिजे परंतु आपण नोकरीसाठी ज्या पद्धतीने मेहनत करतो त्या पद्धतीने व्यवसाय करण्यासाठी कुठलेही प्रशिक्षण न घेता उद्योग सुरू केले तर तो व्यवसाय व उद्योग यशस्वी चालेल याची गॅरंटी नसते म्हणून उद्योग करण्यापूर्वी उद्योगाची पूर्ण माहिती घेऊन उद्योग केले.
तर आपणास कोणतीही अडचण येणार नाही असे त्यांनी यावेळी सांगुन आंबेडकर मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी आयोजित केलेल्या या सुंदर परिषदेचे मनापासून अभिनंदन केले असून येणाऱ्या काळात आंबेडकर मिशनचे एक हजार तरुण उद्योगपती झाले पाहिजे यासाठी माझी जी मदत लागेल ती करण्यासाठी मी आपल्या सोबत आहे असा विश्वास त्यांनी यावेळी दिले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आंबेडकर मिशनचे प्रमुख कांबळे यांनी केले यावेळी विविध क्षेत्रातील उद्योजक व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.



