गावाकडच्या बातम्यानांदेडनायगांव

मेळगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी प्रल्हाद शिंदे तर उपाध्यक्ष पदी गणेश शिंदे यांची निवड…

New Bharat Times नेटवर्क

नायगाव :- तालुक्यातील जि.प.प्रा. शाळा मेळगाव येथिल शाळा व्यवस्थापन समितीची निवड पालकांच्या उपस्थिती मध्ये खेळीमेळीच्या वातावरणा मध्ये करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यासाठी शाळेत पालक सभा घेण्यात आली.

या सभेला गावातील विद्यमान सरपंच प्रतिनिधी अशोकराव मरीबा माहिपाळे, उपसरपंच प्रतिनिधी मारोतराव शिंदे, पोलीस पाटील हनुमंतराव शिंदे, बळवंतराव शिंदे, बालाजी नरवाडे, किशन कुर्णापल्ले, माजी सरपंच मोहन धसाडे, मारुती शिंदे, उद्धव बंडेवाड, उद्धव नरवाडे, रामू कंदरवाड, गणेश कुर्णापल्ले, माधव शिंदे व मावळते अध्यक्ष दत्ता शिंदे व उपाध्यक्ष भगवान नरवाडे, साहेबराव धसाडे पत्रकार, माणिक शिंदे, सचिन धसाडे, बालाजी कुर्णापल्ले, बापूराव शिंदे, कैलास महिपाळे व गावकरी मंडळी उपस्थित होती.

सर्व गावकरी व पालक जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक एल.जी ब्रम्हकर सर आणि वर्ग शिक्षक बोनागीरे सर यांच्या उपस्थितीमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदी श्री.प्रल्हाद शिंदे, उपाध्यक्ष पदी श्री.गणेश शिंदे व सर्व सदस्य यांची निवड एक मताने करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker