ताज्या बातम्यानांदेडनायगांव

अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त शेळगाव गौरी येथे उद्या सत्यपाल महाराज यांचा कार्यक्रम

मनोहर मोरे

किनाळा :- लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शेळगाव गौरी तालुका नायगाव येथे उध्या दि.24 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता सप्तखंजेरीवादक महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचा कार्यक्रम आणि आर्टीची स्थापना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या मान्यवरांचा जाहीर सत्कार सोहळा नायगाव विधानसभेचे आमदार राजेशजी पवार यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान येथील जयंती मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

शेळगाव गौरी तालुका नायगाव येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे दि.24 ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले असून या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले असून सकाळी ठिक 8-00 वाजता ध्वजारोहण करण्यात येणार असून दुपारी दोन वाजता अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची गावातील प्रमुख मार्गाने भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्र सरकारने मातंग समाजासाठी स्वातंत्र्य आर टी ची स्थापना करण्यात महत्त्वाची भूमिका घेऊन सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल मान्यवर मंडळींचा जयंती मंडळाच्या वतीने नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून सायंकाळी सहा वाजता सप्तखंजेरी वादक सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

जयंती मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सत्कार सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायगाव विधानसभेचे विद्यमान आमदार राजेशजी पवार राहनार आहेत तर कार्यक्रमाचे उद्घघाटक राजेशजी कुंटूरकर यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. सत्कारमूर्ती म्हणून उमरखेड विधानसभेचे आमदार नामदेवजी ससाने, विधान परिषद सदस्य मा.आ.अमित गोरखे यासह सौ.पुनम ताई राजेश जी पवार ह्या विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तर रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनी श्रीधर जगताप हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मारोती वाडेकर, उत्तम गवाले, कैलास भालेराव, प्रीतम गवाले, गंगाधर कोतेवार, राजेंद्र रेड्डी, मा.गायकवाड, यासह अनेक मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष म्हणून शेळगाव गौरीचे सरपंच तथा प्राचार्य मनोहर तोटरे हे राहनार आहेत तरी या आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन येथील अण्णाभाऊ साठे जयंती मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker