डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी नांदेडचा स्तुत्य उपक्रम ; रक्तदान व शैक्षणिक साहित्याचे वाटप

New Bharat Times नेटवर्क
नांदेड : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्ह्याच्या वतीने विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवून बाबासाहेबांना कृतिशील अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात भव्य रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत करून समाजासमोर एक आदर्श ठेवण्यात आला.

जयंतीनिमित्त केवळ उत्सव साजरा न करता, वंचित बहुजन आघाडीने जनहिताचे उपक्रम हाती घेतले होते. यामध्ये प्रामुख्याने:

- भव्य रक्तदान शिबिर: गरजू रुग्णांसाठी रक्ताचा पुरवठा व्हावा या हेतूने कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले.
- आरोग्य शिबिर: नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
- शैक्षणिक साहित्य वाटप: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
- जनसेवा: उन्हाचा कडाका लक्षात घेता पाणी बॉटल वाटप आणि मिठाई वाटप करून आनंद साजरा करण्यात आला.

या सामाजिक उपक्रमास नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी सदिच्छा भेट दिली व उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष फारुख अहमद, मराठवाडा सदस्य संघरत्न कुऱ्हे, दक्षिण जिल्हाध्यक्ष शंकर महाजन, उत्तर जिल्हाध्यक्ष प्रा. राज अटकोरे, ज्येष्ठ नेते शिवाभाऊ नरंगले, आणि गटनेते प्रशांत इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा महासचिव दक्षिण रवि पंडित, उत्तर महासचिव दीपक मगर, जिल्हा संघटक संजय टिके, सचिव रंगनाथ गजले, उपाध्यक्ष के. एच. वने, अरुण भद्रे, धाराजी हिंगोले, बालाजी सूर्यतळे, सवयी सोनकांबळे, नामदेव पांचाळ, डॉ. राम वनंजे, जयपाल ढवळे, विद्यानंद पवळे, प्रल्हाद इंगोले, गोरखनाथ पाटील, सुरेश गजभारे, विनय मोरे यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
”डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार केवळ भाषणातून नव्हे, तर कृतीतून समाजापर्यंत पोहोचवणे हाच आमचा उद्देश आहे,” अशी भावना यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.



