राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा दिवंगत खा.वसंतराव चव्हाण यांच्या पत्नीसाठी शोक संदेश

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : खा.वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दुख व्यक्त केल्या असून. खा. चव्हाण यांच्या पत्नी सुंदरबाई चव्हाण यांच्या नावे शोक संदेश पाठवून धक्क्यातून सावरण्याची ईश्वर प्रेरणा देवो अस हिंदीतून संदेश पाठवला आहे.
नांदेड लोकसभेचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या दुःखद निधन झाले.त्यांच्या निधनाने एक दिलदार व विकासपुरुष लोकनेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. चव्हाण यांच्या निधनामुळे राज्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर शोक व्यक्त करत असून. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाबद्दल संवेदना व दुख व्यक्त केल्या असून.
खा.चव्हाण यांच्या पत्नी सुंदरबाई चव्हाण यांच्या नावे शोक संदेश पाठवून खासदार कै.वसंतराव चव्हाण हे ज्येष्ठ राजकारणी आणि लोकप्रिय समाजसेवक होते. परिसराच्या विकासासाठी ते सदैव समर्पित होते. श्री.चव्हाण यांचे राज्यातील जनतेशी अतूट नाते होते.
त्यांची सेवा देश, विशेषतः महाराष्ट्रातील जनता सदैव स्मरणात ठेवेल अशा शब्दात देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पाठवलेल्या शोकसंदेशात म्हटले आहे. चव्हाण यांच्या निधनामुळे अतीव दुःख झाले आहे महाराष्ट्रातील जनता खासदार वसंतराव चव्हाण यांना सदैव स्मरणात ठेवेल सर्व कुटुंबीयांना माझ्या संवेदना व्यक्त करते. असा राष्ट्रपतींनी हिंदीतून शोकसंदेश पाठवला आहे.