आमदार साहेब फुकटचे श्रेय घेवू नये : माणिकराव लोहगावे यांची फेसबुक पोस्ट चर्चेत

अंकुशकुमारदेगावकर
नायगाव : नरसी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संस्कृतीक सभागृहासाठी जो एक कोटीचा निधी मिळाला त्याचे श्रेय स्थानिक आमदार घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे यांनी आमदार साहेब फुकटचे श्रेय घेवू नये अशी फेसबुकवर पोस्ट लिहील्याने श्रेयवादाला तोंड फुटले असून. लोहगावे यांच्या पोस्टला उत्तर देतांना अनेकांनी आमदारांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा भाजप ओबीसी आघाडीचे उपाध्यक्ष माणिकराव लोहगावे यांनी मागील दोन तीन वर्षांपासून नरसी येथील खंडोबा मंदिर परिसरासाठी संस्कृतीक सभाग्रह व्हावे यासाठी ते माजी खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या पुढाकारातून प्रयत्न चालवले होते.
दाखल केलेले प्रस्ताव मागच्या सरकारने नामंजूर केले होते. मात्र महायुतीचे सरकार आल्यानंतर लोहगावे यांनी नरसीसह वझरगा, माळेगाव व रिसनगाव येथेही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संस्कृतीक सभागृहासाठी निधीसाठी प्रयत्न सुरु केले.
लोहगावे यांनी डॉ. विकास महात्मे यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला.
त्यामुळे नरसी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संस्कृतीक सभागृहासाठी एक कोटीचा निधी मंजूर झाला. पण प्रसिद्धीसाठी हपापलेल्या आ. राजेश पवार यांनी सदरच्या निधीचे श्रेय घेण्यासाठी स्वतः व पत्नीचा फोटो असणारे एक बँनर तयार करुन नरसी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संस्कृतीक सभागृहासाठी एक कोटीचा रु चा न भुतो, ना भविष्यती असा भरघोस निधी असा मजकूर लिहुन समाजमाध्यमातून व्हायरल केले. लोहगावे यांची फेसबुक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
समाजमाध्यमातून व्हायरल झालेली पोस्ट पाहील्यावर लोहगावे यांनी आ.राजेश पवार यांच्या फुकटचे श्रेय घेण्याच्या प्रकारावर नाराजी व्यक्त करतांनाच त्यांनी जशास तसे आणि सडेतोड फेसबुकवर पोस्ट लिहून उत्तर दिले. त्यांनी आमदार साहेब फुकटचे श्रेय घेवू नये, मी खासदार डॉ.विकासजी महात्मे यांच्या माध्यमातून जिल्ह्यात नरसी, वझरगा, माळेगाव व रिसनगाव असे चार सभागृह मंजूर करुन आणलेले आहेत. या मंजूर सभागृहाचे श्रेय माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, पालकमंत्री गिरीश महाजन व डॉ. विकास महात्मे यांना जाते असे नमूद केले.
लोहगावे यांची फेसबुक पोस्ट व्हायरल झाल्यावर नेटकरी आ. राजेश पवार यांना चांगलेच फटकारत आहेत. तर दुसरीकडे या श्रेयवादावरुन भाजमध्येच जुंपल्याचे पहायला मिळत आहे.