ताज्या बातम्यानांदेडनायगांव

खरडून गेलेल्या जमिनीसाठी विशेष पॅकेज जाहीर करा : खा रवींद्र चव्हाण यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : जिल्ह्यात अतिवृष्टी व ढगफुटीमुळे खरडून गेलेल्या जमिऩीसाठी विशेष पेकेज देऊन शेतकऱ्यांना आर्थिक आधार द्यावा, अशी मागणी खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शुक्रवारी एका निवेदनाद्वारे केली.

मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची खा.रवींद्र चव्हाण यांनी भेट घेतली. याप्रसंगी नांदेड जिल्ह्यातील पुरपरिस्थिती, बाभळी बंधारा बॅक वॉटर व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत २० मिनिटे चर्चा झाली. पुरामुळे जिल्ह्यातील शेकडो हेक्टर जमीन खरडून गेली असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे, त्यामुळे शासनाने खरडून गेलेल्या जमिऩीसाठी कर्नाटक सरकारच्या धर्तीवर नांदेडसाठी विशेष पेकेज जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा या मागणीचे निवेदन त्यांनी सादर केले. खासदार रवींद्र चव्हाण यांनी निवेदनात नमूद केलेल्या मुद्द्यांवर चर्चा करून निर्णय घेऊ असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या दोघांनाही खासदार रवींद्र चव्हाण यांनी मागण्यांचे स्वतंत्र निवेदन सादर केले. या वेळी पणन मंत्री ना.जयकुमार रावल, शिक्षण मंत्री दादाजी भुसे,आशिष शेलार, ना.छगन भुजबळ यांचीही उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker