ताज्या बातम्यानांदेडबिलोली

अर्जापुर येथील पानसरे महाविद्यालयातील प्राध्यापक भरती शासन नियमाप्रमाणेच, भरती रद्द करण्याचे कोणतेही शासन आदेश नाहीत…

कुंडलवाडी प्रतिनिधी :- येथून जवळच असलेल्या अर्जापूर येथील पानसरे महाविद्यालयात प्राध्यापक भरती पवित्र पोर्टल द्वारे दि.२१ ऑगस्ट पासून सुरू आहे. यासाठी शासनाद्वारे आलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे काम संस्थेतर्फे सुरू आहे. या मुलाखती या शासन नियमानुसारच होत असून याबाबत काहींनी शिक्षण उपसंचालकाकडे तक्रार केली आहे. शिक्षण संचालकाकडून भरती रद्द करण्याचे कोणतेही आदेश आले नसल्याची माहिती संस्थेचे सचिव सुनील बेजगमवार यांनी दिली आहे.

बिलोली तालुक्यातील अर्जापूर येथे हुतात्मा गोविंदराव पानसरे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात सन २०१७ पासून अनेक प्राध्यापक सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी भरती करण्यासाठी शासनाच्या पवित्र पोर्टल द्वारे एका जागेसाठी १० उमेदवारांना मुलाखतीसाठी संस्थेकडे पाठवण्यात आले आहे.

दि.२१ ऑगस्ट रोजी विज्ञान शाखे तील प्राध्यापकांची निवड करण्यासाठी मुलाखती पार पडल्या व दि.२२ ऑगस्ट रोजी कला शाखेसाठी व दि.२३ ऑगस्ट रोजी वाणिज्य शाखेसाठी च्या प्राध्यापकांच्या भरतीसाठी उमेदवारांच्या मुलाखती पार पडणार आहेत.

याबाबत काहींनी आकसबुद्धीने व जाणीवपूर्वक भरती प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्यासाठी लातूर येथील शिक्षण उपसंचालक तक्रारी केल्या आहेत या तक्रारीत कोणतेही तथ्य नसून शासनाने दिलेल्या नियमानुसारच उमेदवारांच्या मुलाखती पार पडत आहेत व शासनाने पाठवलेल्या उमेदवारांमधूनच प्राध्यापकांची निवड करण्यात येणार आहे.

यामुलाखती साठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारीही मुलाखती समितीत सदस्य आहेत व मुलाखती दरम्यान शिक्षण विभागाचे अधिकारी संस्थेच्या संचालक मंडळासोबत उपस्थित आहेत. यामुळे मुलाखती या शासन नियमानुसारच होत असून काहींनी महाविद्यालयाची बदनामी व स्वार्थापोटी तक्रारी केल्या असल्याचे संस्थेचे सचिव सुनील बेजगमवार यांनी सांगितले आहे.

◆ दिनांक २२ ऑगस्ट रोजी एका दैनिकात प्राध्यापक भरती मुलाखतीचे आदेश रद्द केले असल्याची बातमी प्रकाशित करण्यात आली या बातमी संदर्भात नांदेड येथील त्या दैनिकाच्या वृत्तसंपादकाशी सचिव सुनील बेजगमवार यांनी संपर्क केला आहे व चुकीची बातमी का प्रसारित केली याचा खुलासा देण्याची मागणी करण्यात आली.

तसेच या बातमी संदर्भात वर्तमानपत्र व वर्तमानपत्राच्या प्रतिनिधीला महाविद्यालयाकडून नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव सुनील बेजगमवार यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker