ताज्या बातम्यादेगलुरराजकारण

अविनाश घाटेंना बिलोलीत झटका निवृतीराव कांबळे यांना उमेदवारी तर मुखेडमध्ये हनमंतरावांना लाँटरी

प्रकाश महिपाळे

नायगाव : अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या बिलोली-देगलूर मतदार संघातून उमेदवारी मिळेल या विश्वासावर. माजी आमदार अविनाश घाटे यांनी हनमंतराव बेटमोगरेकर यांचे बोट धरुन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र येथून निवृतीराव कांबळे या नवख्याला संधी मिळाल्याने घाटेना जोरदार झटका बसला आहे. दुसरीकडे मुखेडमध्ये माजी आमदार हनमंतराव बेटमोगरेकर यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे.

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या बिलोली-देगलूर मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्यासाठी दोन डझन नेते रांगेत होते. अनेकांनी कुठल्याही परिस्थितीत मलाच उमेदवारी मिळेल असा दावा करत होते. दावे प्रतिदावे करण्यात येत असताना बौध्द समाजाने काँग्रेस आमचा कधी विचार असा प्रश्न उपस्थित करत होते. कारण बौद्ध आणि मातंग समाजाचे या मतदार संघात प्राबल्य आहे पण मागच्या तीनही वेळा काँग्रेसने मातंग समाजाचाच उमेदवार दिला होता. त्यामुळे यावेळी बौद्ध समाजाचा उमेदवार देण्यात यावा अशी मागणी होत होती.

शनिवारी रात्री काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत बिलोली-देगलूर मतदार संघातून निवृतीराव कांबळे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण कांबळे यांची आग्रही मागणी तर नव्हतीच पण ते काँग्रेसमध्ये सक्रीय नव्हते त्यामुळे त्यांच्या नावाचा कुणीही विचार केला नव्हता. उमेदवारीच्या स्पर्धेत मुखेडचे माजी आमदार अविनाश घाटे हे होते त्यांनी उमेदवारी मिळेल या विश्वासावरच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि मतदार संघात भेटीसाठी घेण्यासही सुरुवात केली होती. परंतु ऐनवेळी त्यांच्याऐवजी कांबळे यांना उमेदवारी मिळाल्याने घाटे यांना हा जोरदार धक्का आहे.

अविनाश घाटे हे माजी आमदार हनमंतराव बेटमोगरेकर यांच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये आले पण काँग्रेसने बेटमोगरेकरांना मुखेडमधून उमेदवारी देतांना बिलोली घाटेंना जोरदार धक्का दिला आहे. बौद्ध समाजाची मागणी होती त्यामुळे सुरेश गायकवाड यांच्या नावाचा विचार होईल असे वाटत होते पण काँग्रेसने धक्कातंत्राचा वापर करुन निवृतीराव कोंडीबा कांबळे यांना उमेदवारी जाहीर केली. कांबळे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदार संघात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker