ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

वीट भट्यांची माती जप्त करून सातबा-यावर बोजा टाकण्याची मागणी…

⚡ अन्यथा लोकशाही मार्गाने उपोषण करण्याचा इशारा ⚡ यादवराव लोकडे यांची निवेदनाद्वारे मागणी

New Bharat Times नेटवर्क

बिलोली : तालुक्यात गेल्या काही महिण्यापासून जागोजागी अनधिकृत वीट भट्या थाटल्या असून सदर वीट भटी चालक मोठया प्रमाणात अवैध काळी माती साठवली असल्याने ती माती जप्त करून संबंधित शेतक-यांच्या सातबा-यावर बोजा टाकण्याची मागणी पत्रकार यादवराव लोकडे यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

बिलोली तालुक्यात तालुका महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने मोठया प्रमाणात अवैध व्यवसाय सुरु असून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे, यामध्ये रेती, माती, मुरूम, विट यांसह अनेक व्यवसायाचा समावेश आहे.

सोबतच तालुक्यात अनधिकृत विटभट्या जागोजागी थाटून मोठया प्रमाणात मातीचा अवैध साठा जमा केले आहेत, त्यामुळे प्रशासनाने या सर्व विटभट्यांची चौकशी करून साठवलेली माती जप्त करावी व संबंधित शेतकऱ्यांच्या सातबा-यांवर बोजा टाकावा.

अन्यथा लोकशाही मार्गाने उपोषण करण्यात येईल असे निवेदन पत्रकार यादवराव लोकडे यांनी तालुका प्रशासनाकडे सादर केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker