व्हाईस ऑफ मीडिया नांदेड पोर्टलविंग जिल्हा कार्याध्यक्ष पदी पवनकुमार पुठ्ठेवाड कुंटूरकर यांची निवड…
New Bharat Times नेटवर्क
कुंटुर :- व्हाईस ऑफ मीडिया नांदेड पोर्टलविंग जिल्हा कार्याध्यक्ष पदी पवनकुमार पुठ्ठेवाड कुंटूरकर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनाज्येष्ठ व जिल्हा पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते नियुक्ती पत्र देवून त्यांच्या कार्याला प्रोस्थाहित करन्यात आले. पवनकुमार पुठ्ठेवाड कुंटूरकर यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत करन्यात होत आहे.
जगामध्ये ४३ देशांमध्ये कार्यरत असलेली ग्रीनीज बुक मध्ये नोंद असलेली भारतातील नंबर वन ५५ हजार सदस्य जोडले गेलेली व्हाईस ऑफ मीडिया एकमेव पत्रकार संघटना असून या संघटनेच्या नांदेड जिल्हा शाखेची बैठक नांदेड येथील सह्याद्री विश्रामगृह येथे जिल्हाध्यक्ष गणेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली, राज्य सहचीटनिस श्रीनिवास भोसले,जिल्हा कार्यध्यक्ष बाळासाहेब पांडे,आदी पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक २५.१२.२०२४ रोज बुधवार रोजी दुपारी साडेतीन वाजता घेण्यात आली.
या बैठकीमध्ये व्हॉईस ऑफ मीडिया च्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती नांदेड जिल्हाध्यक्ष पदी श्रीधरराव नागापूरकर यांची निवड व नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष पोर्टलविंग पदी पवनकुमार पुठ्ठेवाड कुंटूरकर नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अरोग्य विभागाच्या जिल्हा सचिव पदी संजय धरमूरे यांची तर मूखेड तालूका पालक सचिव पदी नागेश कल्याण यांची संस्थापक अध्यक्ष आदरणीय भाई संदीप काळे साहेब यांच्या आदेशानुसार व सर्वानुमते ही निवड प्रक्रिया करण्यात आली.
या निवडीचे नियुक्ती पत्र प्रदेश सहचिटणीस श्रीनिवास भोसले,जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश जोशी, जिल्हाकार्याध्यक्ष बाळासाहेब पांडे,उपाध्यक्ष तुकाराम सावंत, रवींद्र कुलकर्णी, सचिव अनिल धमणे, सूर्यकुमार यन्नवार, संघटक ऋषिकेश कोंडेकर यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी सुरेश अंबटवार, गंगाधर ढवळे, भारत वाणेरकर, डॉ.सप्निल बनसोडे, किशोरकुमार वागदरिकर आदी वरिष्ठ पत्रकार व व्हॉईस ऑफ मिडियाचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यातील पत्रकारांना प्रोटेक्ट करत एका तिजोरीतील खजिण्या प्रमाणे पत्रकारांना जपत जर पत्रकारावर कोणताही हल्ला झाल्यास कोणती समस्या निर्माण झाल्यास त्याचा बीमोड करत पत्रकारांच्या पाठीमाघे खंबीर पने उभ राहून बळ देण्याच्या दूरदृष्टीने आदरणीय संस्थापक अध्यक्ष भाई संदीप काळे यांनी ही समिती स्थापन केली आहे असे गणेश जोशी यांनी अध्यक्षीय समारोपात सांगितले.