ग्रामीण साहित्य संमेलनासाठी निधी उपलब्ध करून देणार – खा.रविंद्र चव्हाण
New Bharat Times नेटवर्क
भोकर : ग्रामीण भागात वाचन कौशल्यवाढीसाठी ग्रामीण साहित्य संमेलनाची नितांत गरज आहे. वाचन संस्कृतीमुळे आम्हा राजकीय लोकांना एक चांगली दिशा मिळते आणि चांगले अधिकारी घडविण्यासाठी साहित्यांची मदत होते. साहित्य संमेलने दरवर्षी व्हावीत ही आपली मनापासून इच्छा आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून राखीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही खा.रवींद्र चव्हाण यांनी भोकर येथील साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी दिली.
भोकर येथील शाहू महाराज हायस्कुल ज्यु. कॉलेज, सेवा समर्पण परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २० व्या राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संलेलनाचे उद्घाटन खा.रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते झाले. संमेलनाध्यक्ष म्हणून प्रा.महेश मोरे तर प्रमुख अतिथी म्हणून आ.हेमंत पाटील, राजश्रीताई पाटील यांच्यासह स्वागताध्यक्ष सुरेशभाऊ देशमुख गोरठेकर, आयोजक दिगंबर कदम, राजेंद्र खंदार, प्रवीण शेटे, उपायुक्त बाळासाहेब पाटील रावणगावकर, मार्तंड कुलकर्णी, डॉ.यु एल.जाधव, प्रा. पंजाबराव चव्हाण, गोविंदराव सिंधीकर, देविदासराव फुलारी, प्रकाश भिलवंडे, सुरेश बिल्लेवाड, पांडुरंग देशमुख, गोविंद बाबा गौड, सुधीर गुट्टे, गणेश कापसे, माधवराव पाटील पन्हाळकर, नागोराव पाटील रोशनगावकर, निळकंठराव वर्षवार, बाबुराव कदम कोंडेकर, श्रीधर पाटील चव्हाण, बालाजी पेटेकर खतगावकर, अशोक पवळे सर, रमेश पाटील कांडाळकर यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना खा.रवींद्र चव्हाण म्हणाले, सद्यस्थितीत फेसबुक, व्हॉट्सअपच्या बेसुमार वापरामुळे वाचन कौशल्य लोप पावत आहे. ही परिस्थिती आता सुधारण्याची गरज असून साहित्य वाचन संस्कृती वाढण्याची गरज आहे.
यावेळी प्रशासकीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांना राज्यस्तरीय प्रशासकीय सेवा समर्पण पुरस्कार, तर राजश्री हेमंत पाटील यांना राज्यस्तरीय महिला विकास सेवा समर्पण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
माजी प्राचार्य गोविंद मेथे यांना जीवनगौरव पुरस्कार, माजी प्राचार्य संजय सावंत देशमुख यांना शैक्षणिक कार्यासाठी, डॉ.मनीषा रामेश्वर भाले यांना वैद्यकीय क्षेत्रासाठी, डॉ. ओमप्रकाश जयवंतराव पाटील संशोधन क्षेत्र, विकास अशोकराव वाठोरे शैक्षणिक क्षेत्र, प्रा. साई किरण गंगाधर सलगरे शैक्षणिक कार्य, अजय प्रल्हादराव सरसे शैक्षणिक क्षेत्र, भगवान काळे सद्भावना क्षेत्र, श्रीमती सुवर्णा प्रवीण फरताळे उद्योग क्षेत्र, स्वाती सुधीर वायकर उद्योग क्षेत्र, मनोहर कदम यांना पत्रकारिता, माधवराव पाटील ढगे कृषी क्षेत्र, सिंधुताई टाले साहित्य क्षेत्र, लक्ष्मणराव जनकवाडे सामाजिक क्षेत्र,अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना गौरविण्यात आले. यावेळी अनेक साहित्यिक, साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.