पत्रकार व लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून शहर विकास शक्य – कुंडलवाडी सोसायटीचे चेअरमन सुनील बेजगमवार यांचे प्रतिपादन
● सोसायटीचे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष सुनील बेजगमवार यांच्याकडून पत्रकारांचा सन्मान कार्यक्रम ◆ कुंडलवाडी शहरात प्रथमच लोकप्रतिनिधी कडून दर्पण दिनिनिमित्त पत्रकार सन्मान कार्यक्रमाचे आयोजन
कुंडलवाडी :- पत्रकार हा समाजाचा आरसा आहे.समाजातील प्रश्न आपल्या वर्तमानपत्रातून पत्रकार समाजासमोर मांडण्याचे काम करतात. पत्रकारांनी शहरातील जनतेच्या समस्या व प्रश्न पत्रकारितेच्या माध्यमातून मांडावेत व लोकप्रतिनिधींनी जनतेचे समस्या व प्रश्न शासन व प्रशासन दरबारी सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. पत्रकार व लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून शहराचा विकास शक्य असल्याचे प्रतिपादन सोसायटीचे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष सुनील बेजगमवार यांनी केले आहे.
कुंडलवाडी येथील सोसायटीच्या मुख्य कार्यालयात सोसायटीचे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष सुनील बेजगमवार यांच्याकडून दर्पण दिनाचे औचित्य साधत दि.१२ जानेवारी रोजी सांयकाळी ४ वाजता शहरातील पत्रकार बांधवांचा सन्मान कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अध्यक्षीय समारोप करताना चेअरमन सुनील बेजगमवार बोलत होते. पुढे बोलताना चेअरमन सुनील बेजगमवार म्हणाले की, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारितेकडे पाहिले जाते. या माध्यमातून वेळोवेळी समाजाचे प्रश्न शासन व प्रशासन दरबारी मांडल्या जातात. आगामी काळातही कुंडलवाडी शहराच्या विकासासाठी पत्रकार व लोकप्रतिनिधीचे समन्वय असणे गरजेचे असल्याचे मत चेअरमन सुनील बेजगमवार यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन सुनील बेजगमवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पानसरे महाविद्यालयाचे उपाध्यक्ष राजेश्वरराव उत्तरवार,व्हाँईस चेअरमन गंगाधर नरावाड, शहर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कुणाल पवारे, सचिव माजीद नांदेडकर, कार्याध्यक्ष राजू लाभशेटवार, आदिजन यावेळी उपस्थित होते. शहरातील पत्रकारांचा सुनील बेजगमवार यांच्यातर्फे दर्पण दिनाच्या निमित्ताने डायरी, पेन व पुष्पगुच्छ देऊन येथोचित सन्मान करण्यात आले.
यावेळी शहर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कुणाल पवारे, पत्रकार गणेश कत्रुवार, पत्रकार मोहम्मद अफजल, पत्रकार डॉ.माधव हळदेकर, पत्रकार सिद्धार्थ कांबळे, आदींनी आपली मनोगत व्यक्त केली.यावेळी पानसरे महाविद्यालयाचे उपाध्यक्ष राजेश्वरराव उत्तरवार, दत्तु हमंद यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल डॉ.नरेश बोधनकर व दत्तू हमंद यांचा सुनील बेजगमवार यांच्यातर्फे पेन,डायरी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास माजी नगरसेवक श्रीनिवास जिठ्ठावार, सोसायटीचे माजी चेअरमन सयाराम नरावाड, पानसरे महाविद्यालयाचे संचालक साईनाथ दाचावार, सोसायटीचे संचालक नरेश सब्बनवार, संजय गंगोणे, बंडूसेठ मुनगीलवार, माजी नगरसेवक गंगाप्रसाद गंगोने, मॅनेजर राम रत्नागिरे यांच्यासह शहरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.नरेश बोधनकर यांनी केले तर आभार प्रदर्शन गंगाप्रसाद गंगोणे यांनी केले.