ताज्या बातम्यानांदेडबिलोली

कुंडलवाडी शहरात विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

कुंडलवाडी :- कुंडलवाडी शहरातील विविध ठिकाणी दि.१५ आँगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. शहरातील नगरपरिषद येथील प्रांगणात नगर परिषदेचे प्रशासक तथा बिलोलीच्या उपजिल्हाधिकारी क्रांती डोंबे, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सुनील बेजगमवार, पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ.सारीका अनमुलवाड, मिलिंद प्राथमिक व विद्यालयात सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कुणाल लोहगावकर, कैै.गंगाबाई पोतन्ना सब्बनवार विद्यालय येथे मार्कण्डेय एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ.प्रशांत सब्बनवार.

उर्दू प्राथमिक व हायस्कूल शाळेत संस्थेचे अध्यक्ष राजकिशोर दाचावार, वीज वितरण कंपनी कार्यालयात कनिष्ठ अभियंता सुरेश गट्टुवार, कृषी उत्पन्न बाजार समितीत उपसभापती साईनाथ पाटील निवळे, के.रामलू पब्लिक स्कूलमध्ये श्री कुंडलेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका रमा ठक्कुरवार, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळेत मुख्याध्यापक पी.जी.सोनकांबळे, जिल्हा परिषद हायस्कूल येथे मुख्याध्यापक संदिप कामठाणे, राजर्षी शाहू महाराज प्राथमिक शाळेत डॉ.हेडगेवार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुभाष गायकवाड, अर्जापूर येथील मेघावी सिमेंट कारखान्यात कुंडलवाडी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सुनील बेजगमवार याांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker