ताज्या बातम्यानांदेडनायगांव

नरसीत अपंग निवासी विद्यालयात राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

New Bharat Times नेटवर्क

नायगाव :- नरसी येथील अपंग निवासी विद्यालयात राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात करण्यात आली. प्रारंभी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनी श्रीधर जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मागील पंधरा वर्षांपासून डेबुजी फोर्सचे प्रदेश अध्यक्ष कैलास तेलंग टेंभुर्णीकर हे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षी वर्षी वेगवेगळ्या शाळेत विद्यार्थ्यांना वही, पेन, खाउ, वाटप करून जयंती साजरी करत असल्याने रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनी श्रीधर जगताप यांनी आपल्या भाषणातून कैलास तेलंग टेंभुर्णीकर यांचे कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिले.

आज दि. २३ फेब्रुवारी रोजी रविवारी नरसी येथील अपंग निवासी विद्यालयात विद्यार्थ्यांना पेन, वही, खाऊ, वाटप करून जयंती साजरी केली. राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जीवन चरित्रावर रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनी श्रीधर जगताप, कैलास तेलंग टेंभुर्णीकर, गंगाधर गंगासागरे, सह अनेकांनी विचार मांडले.

यावेळी पत्रकार दिलीप वाघमारे, गोविंद नरसीकर, तानाजी शेळगावकर, गणेश कंदुरके व शाळेतील शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker