मशाल रॅली काढत, काँग्रेसने केला मतदान चोरीचा निषेध ; वोट चोर, खुर्ची छोडच्या जोरदार घोषणाने परिसर दुमदूमला

New Bharat Times नेटवर्क
नांदेड : – लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाने मतदार यादी मध्ये केलेल्या भ्रष्ट कारभाराची पुरावे देऊन मतदान चोरी दाखवून दिली आहे. दरम्यान या मतदान चोरी विरोधात, शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फ स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला गुरुवार (ता. १४) रोजी मशाल रॅली काढण्यात आली. खा. रवींद्र चव्हाण यांच्यासह दक्षिण काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, उत्तर काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात शहरातील क्रांतीज्योती महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्या पासून ते काँग्रेस पक्ष कार्यालय दरम्यान ही मशाल रॅली काढण्यात आली. वोट चोर, खुर्ची छोडच्या जोरदार घोषणाने परिसर दुमदूमला होता.
भारतीय जनता पक्षाला थेट लाभ होईल अश्या पद्धतीने, निवडणूक आयोगाने मतदार यादीत घोटाळा केला. मतचोरी करून भाजपा कशी सत्तेत आली याबद्दल पुरावे देत राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. दरम्यान या मतदान चोरी विरोधात शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील क्रांतीज्योती महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्या पासून ते काँग्रेस पक्ष कार्यालय नवा मोंठा दरम्यान, खा. रवींद्र चव्हाण यांच्यासह दक्षिण काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा माजी आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, उत्तर काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात गुरवार (ता.१४) रोजी मशाल रॅली काढण्यात आली होती.
यावेळी डॉ.श्रावण रॅपनवाड, प्रा.यशपाल भिंगे, सुरेंद्र घोडजकर, मसूद अहेमद खान, शमीम अब्दुल्ला, पप्पू पाटील कोंढेकर, डॉ.रेखा पाटील, जयश्री पावडे, आनंद चव्हाण, महेश देशमुख तरोडेकर, निरंजन पावडे, सतीश देशमुख तरोडेकर, डॉ.करुणा जमदाडे, बालाजी चव्हाण, इंजि.नसीम पठाण, रहीम खान, अजिज कुरेशी, मुतजीब, सुरेश हाटकर, सत्यपाल सावंत, माधवराव पवळे, अनिल चिमेगावकर,गणेश ढगे, अतुल पेद्देवाड, अंबादास रातोळे, प्रवीण कानघुले.
डॉ.अब्दल बाखी, दीपकसिंग हुजूरीया, गगन यादव, संजय वाघमारे, गौतम सिरसाट, गजानन सावंत, सुभाष काटकांबळे, गगन यादव, पिंटू पाटील आलेगावकर, रफिक पठाण, सुरज शिंदे, गौतम शिरसाठ, प्रसेनजित वाघमारे, अजय एडके, हंसराज काटकांबळे, गणेश पाटील, अभिलाष पावडे, नईम शेख, रिजवान पटेल, प्रबुद्ध चित्ते, नागेश सुलगेकर, संजय शर्मा, महेश शिंदे, ज्योती कदम, किरण पडलवार, कलीम शेख, गोविंद पाटील, धनंजय उमरीकर आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.



