वैष्णवी शिंदे हिचे सुयश

सुभाष पेरकेवार
नरसीफाटा :- उच्च माध्यमिक आश्रमशाळा मरवाळी तांडा येथील विद्यार्थ्यांनी कु.वैष्णवी सोमनाथ शिंदे हिने नुकत्याच जाहीर झालेल्या १२ वि परिक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
काल इयत्ता १२ परीक्षेचा निकाल जाहीर झाला.यात उच्च माध्यमिक आश्रमशाळा मरवाळी तांडा या शाळेने यशाची परंपरा कायम ठेवली असून ९८ टक्के निकाल लागला आहे.यात कु.वैष्णवी सोमनाथ शिंदे या विद्यार्थ्यांनी ८४ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. ती रामतिर्थ पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांची जेष्ठ कन्या आहे.
वैष्णवी शिंदे हिने मिळविलेल्या यशाबद्दल भाजपचे जिल्हा सरचिटणीस माणिकराव लोहगावे, सुभाष पेरकेवार, संस्थेचे मधुकर राठोड, शिक्षक गणेश पाटील मारताळेकर, शिवशंकर कोरे, भिमराव भवरे, पत्रकार गोविंद टोकलवाड, पोलिस पाटील इब्राहीम बेग पटेल, डॉ.संतोष धुप्पेकर, अर्जुन मेहता, जितेंद्र मेहता, शुभम कुंडगिर, रंगनाथ कटारे, गजानन खंडागळे, ऊमाकांत सुशे, सुप्रिया सुशे व अबोली भोसले, मनिषा वाघमारे मित्रपरीवार तसेच कुंटुंबातील आप्तपरीवारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.