शैक्षणिक वर्ष संपत आले तरी गणवेश मिळेनात ; नायगाव तालुक्यातील 10 हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : शाळेच्या पहील्याच दिवशी गणवेश देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती पण वर्ष सरता सरता एक ड्रेस कसाबसा मिळाला परंतु दुसरा 15 आँगस्ट 26 जानेवारी गेली व वर्ष संपत आले तरी गणवेश मिळाला नाही. परिणामी नायगाव तालुक्यातील 10 हजार जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यी गणवेशापासून वंचित राहिले आहेत.
जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश देण्याबाबत दरवर्षी घोळ घातल्या जातो कारण शासन कधी कपडा देतो म्हणते तर कधी शाळा स्तरावरच गणवेश खरेदी करण्याचे आदेश देत असते. पण शाळा स्तरावर खरेदी करण्यात येत असलेल्या गणवेशाची गुणवत्ता दर्जेदार नसल्याच्या कारणामुळे यंदा मात्र शालेय शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या शाळेतील गणवेशाचा एकच रंग असावा यासाठी राज्यस्तरावर कापड खरेदी करण्याचा निर्णय घेतला व ग्रामीण भागात महिला बचत गटाकडून शिवून घेण्याच्या सुचना दिल्या. प्रत्येक गणवेशासाठी 110 रुपये दर ठरवण्यात आला आहे.
वास्तविक यापूर्वी शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने शाळेच्या पहील्याच दिवशी गणवेश वाटप करण्याची घोषणा केली होती. पहीला ड्रेस जानेवारी महिण्यात मिळाला त्यात अनेक शाळापर्यत ड्रेस पोहचले नाहीत तर काही मुलींचे ड्रेस आलेले नाहीत. पहीला नियमित ड्रेस वर्षाच्या शेवटी मिळाल परंतु वर्ष संपत आला तरी दुसऱ्या गणवेशाचा घोळ संपला नाही.
सन 2023-24 च्या युडायस प्रमाणे नायगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 107 शाळामधील वर्ग 1 ते 8 पर्यंतची विद्यार्थी संख्या 10 हजार 943 आहे. मात्र एवढे विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत. विशेष म्हणजे यंदा सर्व विद्यार्थ्यांना एक बुट जोडी आणि दोन जोड स्वाँक्स मोफत देण्यात आलेत.
एकीकडे शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी टिकवणे अवघड झालेले असतांना शासन जिल्हा परिषदेच्या शाळेत सोईसुविधा व विद्यार्थ्यांना गणवेश व बुट देण्यासाठी दरवर्षी घोळ घालत असते. यंदाही तोच प्रकार दिसून येत आहे शालेय शिक्षण विभागाने पहील्याच दिवशी गणवेश देण्याची घोषणा केली पण वर्ष संपत आले तरी गणवेश मिळाले नाहीत.
जानेवारी महिन्यात नियमित ड्रेस मिळाले असून 200 मुलींचे ड्रेस तयार झाले नाहीत तर स्काऊट गाईडच्या ड्रेसची शिलाई सुरु आहे. महिला बचत गटाकडे कपडे शिलाई करण्यासाठी देण्यात यावे असे आदेश शासनाचेच आहेत. त्यामुळे ड्रेस मिळण्यासाठी वेळ लागला आहे.
संग्राम कांबळे, गटशिक्षणाधिकारी, नायगाव.