ताज्या बातम्यानांदेडनायगांव

नरसीत अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ : विरोध करणाऱ्या आई वडीलांनाही मारहाण ; गुन्हा नोंद

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव : नरसी येथील एका नराधमाने अनुसूचित जातीतील एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ तर केलाच पण तिच्या आई-वडिलाला दि. 27 रोजी जबर मारहाण गंभीर जखमी केले. त्यानंतर पुन्हा बोलत का नाहीस, म्हणून तोंडावर अँसिड टाकून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी २८ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरी रामतीर्थ पोलिसांत आरोपींवर अँट्रासिटीसह पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शामनगर नरसी येथील अरोपीने तू मला का बोलत नाहीस म्हणून घर ते शाळेपर्यंत पाठलाग करत पेपर सुटल्यानंतर ज्यूस सेंटरमध्ये बसून फोटो काढून लैंगिक छळ केला. तसेच आरोपीच्या आई व बहिणीने फिर्यादीच्या आई-वडिलांस लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करून जखमी केले. तू मला नाही बोलल्यास तुझ्या तोंडावर अँसिड टाकून जिवंत मरण्याची धमकीही आरोपीने पिडीत मुलीला दिली.

अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून अरबाज अजिज शेख,ममताज, तब्बु रा.सर्व शामनगर नरसी ता.नायगाव यांच्या विरोधात रामतीर्थ पोलीसात गु.र.न 66/25 कलम 78,75(1),115(2), 352, 351(2),(3),(5) भारतीय न्याय संहिता 2023 सह कलम 8,12 पोस्को प्रमाने कलम 3(1),(आर),(एस)3,(2),(व्ही.ए.) अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरोपीस अद्याप अटक करण्यात आले नाही. सदरील घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी रफिक चँद व रामतीर्थ पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांनी भेट दीली.

रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंडगीरी करणाऱ्यांची संख्या वाढली असून गावगुंड चक्क रामतीर्थ पोलीसांना तीन तीन तास वेठीस धरण्याचे प्रकार वाढले आहेत. तरीही अशा लोकांना अभय देण्याचे काम होत असल्याने रामतीर्थ पोलीस ठाण्याला एका सक्षम अधिकाऱ्याची गरज असल्याचे नागरिक आता बोलून दाखवत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker