ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

जात प्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाईन भरलेले अर्ज स्विकारण्यासाठी विशेष मोहिम : ३१ मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

New Bharat Times नेटवर्क

नांदेड : बारावी विज्ञानच्या विद्यार्थ्यांची घाई लक्षात घेता, जात पडताळणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भरलेले अर्ज 31 तारखेपर्यंत दाखल करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड यांच्या वतीने विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. सदर विशेष मोहिमेच्या अनुषंगाने व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राखीव प्रवर्गात लाभ घेण्याकरिता संबंधित अर्जदारास अर्ज करतेवेळेस जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate-CVC) प्रवेश प्रक्रिया नोंदणी अर्जासोबत अपलोड करणे अत्यावश्यक आहे.

इ. ११ वी व १२ वी विज्ञान शाखा तसेच अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधोपचार, स्थापत्य, पशुवैद्यकिय, मत्स्य, विधी शाखा, बॅचलर ऑफ फाईन आर्ट अशा प्रकारे बारावीच्या आधारे ज्या जेईई, नीट, सीईटी इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावयाचा आहे. अशा अर्जदारांनी विहीत नमुन्यातील जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या शिफारशीसह विशेष मोहिम निमित्ताने दिनांक 31 मार्च, 2025 पर्यंत ऑनलाईन भरलेले परिपूर्ण अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

अर्जदारांनी मुदतीत जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज सादर न केल्यामुळे समितीस अर्जावर मुदतीत प्रक्रिया पूर्ण करुन वैधता प्रमाणपत्र निर्गमित करणे समिती निर्णय देणे अशक्य झाल्यास व त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास अथवा त्रुटी असलेली प्रकरणे विहीत मुदतीत निकाली न निघाल्यास व त्यामुळे अर्जदारास प्रवेशापासून वंचित रहावे लागल्यास यास समिती जबाबदार राहणार नाही.

त्यामुळे अर्जदार/पालकांनी उपरोक्त विशेष मोहिमेच्या अनुषंगाने अर्ज सादर करण्याची दक्षता घ्यावी. शैक्षणिक संस्था व्यवस्थापनाने या बाबी आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या/घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात,

माहे फेब्रुवारी, 2025 मध्ये समितीने अर्जावर मुदतीत प्रक्रिया पूर्ण करुन 1750 डिजिटल जात वैधता प्रमाणपत्र अर्जदाराने ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या ई-मेलवरती वितरीत करण्यात आले आहेत. अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज भरतेवेळेस आपला स्वत:चा ईमेल व भ्रमणध्वणी क्रमांक नमूद करावा, इतर कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीचा ईमेल व भ्रमणध्वणी क्रमांक नमूद करण्यात येऊ नये. अर्जदाराच्या प्रकरणात समितीने घेतलेला निर्णय अर्जदाराने ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या ई-मेलवर वरती कळवीण्यात येतो.

अर्जदारांनी ऑनलाईन भरलेला अर्ज समिती कार्यालयातील खीडकी क्र. 1 वर स्वत: किंवा सखे भाऊ, वडील यांच्या मार्फत दाखल करावे, इतर कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीस कार्यालयास पाठवण्यात येऊ नये.

अर्जदारांनी कोणतेही दलाल/मध्यस्थ किंवा इतर व्यक्तींशी / समाजकंटकांशी संपर्क साधू नये व त्यांच्या दुष्कृत्यास बळी पडू नये. आपले प्रकरण लवकर निकाली काढण्यासाठी किंवा जात वैधता प्रमाणपत्र लवकर देण्यासाठी अशा प्रकारच्या कोणत्याही व्यक्तीकडून आपल्याला आश्वासन दिले गेल्यास व पैशाची/मेहरबानगीची (favour) मागणी केली गेल्यास आपण सजग, चरित्रवान व देशभक्त नागरिक आहात, याची जाणीव ठेवून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे (दूरध्वनी क्र. 02462-255811, टोल फ्री क्रमांक: १०६४) गुप्तरित्या तक्रार नोंदवून, अशा व्यक्तीविरुध्द कायद्यानुसार रितसर कार्यवाही होण्यासाठी शासनास मदत करावी. असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker