निर्दयपणे 22 जनावराची वाहतूक करणारा बोलेरो पिकप रामतीर्थ पोलिसांनी पकडले

मोरे मनोहर
किनाळा :- नांदेड ते देगलुर राज्य महामार्गावरअवैधरित्या एका बोलोरो पिकअपमध्ये लहान मोठे जवळपास 22 जनावरे कोंबून निर्दयपणे वाहतूक करत असताना बिजुर जवळील अक्षय पेट्रोल पंपाजवळ बजरंग दलाच्या सामाजिक कार्यकर्त्यानी हा पिकअप पकडून रामतीर्थ पोलिसांच्या स्वाधीन केले सदरील घटनेत एका जनावरांचा कोंबुन मृत्यू झाल्याची घटना 9 मार्च रोजी घडली असून या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरा गुन्हा नोंद करण्यात आले.
नांदेड कडून देगलूरकडे एम. एच. 26 बि.ई. 1012 बोलेरो पिकअप मध्ये लहान मोठी जवळपास 22 जनावराची पाय बांधून एकावर एक गाडीत निर्दयपणे भरून विनापरवाना जनावरांची वाहतूक करत असताना हा पिकप बजरंग दलाच्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पाहिले असता या कार्यकर्त्यांनी सदरील पिकप बिजुर जवळील अक्षय पेट्रोल पंपाजवळ उभा करून सदरील घटनेची सविस्तर माहिती रामतीर्थ पोलिसांना कळवले.
रामतीर्थ पोलिसांना हि बातमी समजताच पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नरवाडे आणि बिट अंमलदार शिवशंकर शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन सदरील पिकप मध्ये असलेली जनावरे गाडीतून खाली उतरवून पेट्रोल पंपावर जनावरांना पिण्यासाठी पाण्याची व चाऱ्याची व्यवस्था करुण जणावराना जिवदान दिले.
या प्रकरणी रामतीर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नरवाडे यांच्या फिर्यादीवरून पिकप चालकांना ताब्यात घेतले असून बोलेरो पिकअपसह एकविस जनावरे
सुमारे पाच लाख 40 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाअसून सदरील घटनेचा पुढील तपास सपोनी श्रीधर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार शिवशंकर शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.