कुंडलवाडी येथे पोलीस मित्र करंडक तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

कुंडलवाडी :- येथील पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांच्या सौजन्याने पोलीस मित्र करंडक २०२४ तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन १५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता के.रामलू मंगल कार्यालय येथे करण्यात आले आहे.
कुंडलवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांच्या सौजन्याने यावर्षी प्रथमच पोलीस मित्र करंडक २०२४ तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या वक्तृत्व स्पर्धेचे विषय आई-वडील हेच आद्य दैवत हा ठेवण्यात आले असून या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ११११ रुपये व द्वितीय ७११ रुपये, तृतीय पारितोषिक ५११ रुपये असे ठेवण्यात आले आहे. पारितोषिका सोबत मानाचा फेटा,आकर्षक सन्मान चिन्ह व लेखकाच्या स्वाक्षरीसह पुस्तक भेट म्हणून देण्यात येणार आहे.
स्पर्धा संपल्यानंतर लगेचच बक्षीस वितरण होणार आहे.ही स्पर्धा मराठी व हिंदी या भाषेत होणार असून बिलोली तालुक्यातील शाळा व महाविद्यालयातील पाचवी ते बारावीत शिक्षण घेणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.