ताज्या बातम्यानांदेडबिलोली

किनाळा येथील सरपंचाचा 19 जानेवारी रोजी आत्मदहनाचा इशारा

मोरे मनोहर

किनाळा :- किनाळा तालुका बिलोली येथे कार्यरत असलेल्या लाईनमॅन शेख वाय.वाय.यांच्या मनमानी व गैरकारभाराची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा उप कार्यकारी अभियंता नायगाव येथील कार्यालयासमोर 19 जानेवारी रोजी आत्मदहन करण्यात येईल असा इशारा येथील सरपंच विठ्ठल माने यांनी मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता महावितरण परिमंडळ नांदेड यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे दिले.

सविस्तर माहिती अशी की किनाळा तालुका बिलोली येथे कार्यरत असलेले महिला लाईनमॅन शेख वाय. वाय. या विद्युत मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून शेतकऱ्यांचा असलेला डिपी शेतकऱ्याकडून पैसे घेऊन परस्पर दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करून शेतकऱ्याकडून पैसे उकळणे,गावातील वीज ग्राहकाकडून वीज बिलाचे परस्पर पैसे घेऊन विज बिल न भरणे, प्रत्यक्ष कामावर न येता दुसऱ्याच व्यक्तींकडून काम करून घेणे. कामासंबंधी फोन केले तर ग्राहकांचा फोन न उचलणे.

ग्राहक व लोकप्रतिनिधी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे यामुळे गावातील सध्या स्थितीला दोन ते तीन डीपी नादुरुस्त असल्याने ग्राहक व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून अनेक ग्राहक व शेतकरी वैतागले असून त्यांच्या या मनमानी व गैरकारभाराची चौकशी करावे असी मागणी येथील ग्रामपंचायतीचे सरपंच विठ्ठल माने हे विद्युत मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन कळवले.

मात्र त्यांच्या या मनमारी कारभाराची कसलीही चौकशी न करता ग्राहकांना सुविधा न देताच आता लाईनमॅन सोबत सक्तीच्या वसुलीसाठी एक कर्मचारी असून आवाच्या सवा बिल आकारणाऱ्या विद्युत मंडळाकडून सक्तीची वसुली केली जात असल्याने अनेक ग्राहक वैतागले आहेत अशा या परिस्थितीत गावचे सरपंच म्हणून लाईनमॅन यांना या संबंधित काही विचारले तर ते सरपंचांना देखील उद्धट भाषा वापरून अपमानित करत असल्याने.

त्यांच्या या मनमानी व गैरकारभाराची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा 19 जानेवारी रोजी आत्मदहन करण्यात येईल असा इशारा सरपंच विठ्ठल माने यांनी मुख्य अभियंता महावितरण परिमंडळ नांदेड, अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ नांदेड, बिलोली देगलूर विधानसभेचे आमदार जितेश अंतापुरकर, शाखा अभियंता कार्यालय नरसी, पोलीस स्टेशन रामतीर्थ आधी सह विद्युत मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे कळवले आहे.

गावातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विद्युत पुरवठा सुरळीत असणे अत्यंत गरजेचे असते परंतु आमच्या गावासाठी नेमण्यात आलेल्या लाईनमॅन ह्या महिला असल्याने त्यांच्याकडून वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी डीपीची योग्य देखभाल केली जात नसल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होतो यामुळे गावात अनेक वेळा पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत असते.
उपसरपंच बालाजी पाटील भोसले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker