ताज्या बातम्याधर्माबादनांदेड

एस बी सी आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीने धर्माबाद उपविभागीय कार्यालयासमोर अमरण उपोषण

अंकुशकुमार देगावकर

धर्माबाद : एस बी सी आरक्षण बचाव संघर्ष समिती सकल पद्मशाली समाज महाराष्ट्र यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी धर्माबाद उपविभागीय कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी शिवशंकर सुरकुटवार व बालाजी चिंतावार यांनी दि. १ एप्रिल पासून अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

पद्मशाली समाजाच्या विविध मागण्यांसाठी मागच्या २५ वर्षांपासून शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येत असताना सुद्धा पद्मशाली समाजाचा दोन टक्के स्वतंत्र आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी चालढकल करण्यात येत आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे पद्मशाली समाजाच्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. पद्मशाली समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी एस बी सी आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून धर्माबाद येथे अमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.

एस.बी.सी. प्रवर्गाच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष समिती गठीत करून यावे. वैद्यकीय अभियांत्रिकी व इतर उच्च शिक्षणात विशेष मागास प्रवर्गासाठी (एस बी २ टक्के स्वतंत्र आरक्षण २०२५ च्या सत्रापासून लागू करावे. विशेष मागास प्रवर्गासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करावे. विशेष मागास प्रवर्गासाठी राज्यात १० आश्रम शाळा सुरू कराव्यात. विशेष मागास प्रवर्गासाठी २ टक्के राजकीय आरक्षण लागू करावे. विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र तात्काळ द्यावे.

विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या योजनेसाठी एस.बी.सी. व केंद्र सरकारच्या योजनेसाठी ओबीसी प्रमाणपत्र यावे. एस.बी.सी. विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरू करावे. एस.बी.सी. कर्मचाऱ्यांना शासकीय व निम शासकीय सेवेत पदोन्नती द्यावी. विनकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी विनकर आर्थिक महामंडळावर विनकरांची नियुक्ती करून लवकरात लवकर काम सुरू करावे. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब एस.बी.सी. प्रवर्गाच्या प्रलंबित असलेल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी. धर्माबाद उपविभागीय कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी शिवशंकर सुरकुटवार व बालाजी चिंतावार यांनी दि. १ एप्रिल पासून अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

या उपोषण स्थळी युनायटेड पद्मशाली संघमचे प्रदेशाध्यक्ष रोहीत शेठ अडकटलवार, मराठवाडा अध्यक्ष जगन्नाथ बिंगेवार, नागेश पुठ्ठा, प्रभाकर लखपत्रेवार, शंकरराव कुंटूरकर, श्रीनिवास अनंतवार, दिलिप मादास, राजेश यन्नम, नागभुषण सुरकुटवार, अशोक यम्मेवार, शामराव बिंगेवार, गंगाधर मारावार, डॉ. विजयकुमार अंकमवार, साईनाथ सुरकुटवार, साईनाथ अवधुतवार, सिद्राम बंडेवार यांच्यासह मोठ्या संख्येने पद्मशाली समाज बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker