भारतातून नवोदय विद्यालय शंकरनगरचे दोन विद्यार्थी दक्षणा मध्ये पात्र

मोरे मनोहर
किनाळा :- भारतातील नवोदय विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना नवोदय मार्फत दक्षणा ही स्कॉलरशिप मिळते या अंतर्गत नवोदय पुणे इथे पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी जात असतात त्यांची JEE/ IIT परिक्षेसाठी तयारी करून घेतली जाते नवोदय विद्यालय समिती मार्फत भारतातून विविध नवोदय मधून एकूण 199 विद्यार्थ्यांमध्ये नांदेडच्या जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर येथील दोन विद्यार्थ्यांची दक्षणा फाउंडेशन साठी निवड झाली असून या विद्यार्थ्यांचे नवोदय विद्यालयाचे प्राचार्य सुहास मांडले यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिले.
भारतातील प्रत्येक जिल्ह्यात एक असणारे नवोदय विद्यालयात इयत्ता दहावी वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व योग्य शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी दक्षणा फाउंडेशनच्या माध्यमातून JEE/ IIT परिक्षेसाठी त्यांची तयारी करून घेतली जाते दक्षणासाठी भारतातून विद्यार्थी निवडले जातात यात नांदेड जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर येथील सर्व शिक्षकांच्या अथक प्रयत्नातून यावर्षी दोन विद्यार्थ्यांची निवड दक्षणा फाउंडेशन साठी झालेली आहे यामध्ये शौर्य संतोष धुमाळ आणि प्रवीण दत्तात्रय पडलवार हे विद्यार्थी दक्षणासाठी पात्र ठरले आहेत.
भारतातील सर्व नवोदय विद्यालयातील इयत्ता दहावी वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची दक्षणासाठी 199 विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी प्रत्येक नवोदय विद्यालयातच परीक्षा घेतली जाते या घेण्यात आलेल्या परिक्षेत नांदेड जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर येथील दोन विद्यार्थ्यांची दक्षणासाठी निवड झाल्याने या यशस्वी दोन्ही विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य सुहास मांडले यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिले.
भारतातून दक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमधुन जे विद्यार्थी मेडिकलची तयारी करू इच्छितात त्यांना पुणे येथे त्यांची तयारी करून घेतली जाते तर मेडिकल व इतर अन्य क्षेत्रात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची बेंगलोर येथे तयारी करून घेतली जाते.