ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

देगलूर रोडवर दोन बसची समोरासमोर धडक : चौदा प्रवाशी जखमी

New Bharat Times नेटवर्क

देगलूर : लेंडी नदीच्या वळणावर महाराष्ट्र आणि कर्नाटक महामंडळाच्या बसेसची समोरासमोर धडक झाली. यात १४ ते १५ प्रवाशी जखमी झाले. सदरची घटना बुधवार दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली. स्थानिक नागरिक व महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

बुधवार दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू असताना दुपारी २ वाजताच्या दरम्यान बिलोली आगाराची बस क्रमांक एम. एच.१४ बी. टी. १७८० ही देगलूरहुन बिलोली कडे जात असताना देगलूरची लेंडी नदी वरील पुल ओलांडून बागनटाकळी कडील वळणावर जाताच नांदेडहून बिदर कडे भरधाव वेगाने जाणारी कर्नाटकच्या बिदर आगाराची बस क्रमांक के. ए.३८ एफ. १०१३ ही बिलोली बसला समोरा समोरून जोराची धडक दिली. त्यात बिलोली बसचा चालक राहुल मल्हारी हादगले वय ५२ वर्षे राहणार आदमपुर तालुका बिलोली हे गंभीर जखमी झाले त्यामुळे त्यांना देगलूर येथून नांदेड येथे उपचारासाठी हलविण्यात आले.

या अपघातात नागमणी काशीराम कोंडावर वय ६० वर्षे राहणार तेलंगाणा राज्यातील बिचकुंदा वर्षे, लक्ष्मण मष्णाजी कल्लेवाड राहणार हिंगणी तालुका बिलोली वय ७० वर्षे, मष्णाजी नागन्ना बक्कनवार रा. खानापूर तालुका देगलूर वय ५९ वर्षे, वाहक वनिता सुर्यकांत कांबळे वय ३१ वर्षे, अरुणा प्रताप राखे वय २८ वर्षे रा. लोहगाव, ता बिलोली, गंगाबाई सायन्ना मलकुलवार वय ६० रा.कुंडलवाडी, शुभम शिवलिंग जायवार वय १४ वर्षे रा.कुंडलवाडी ता.बिलोली, शेख नसीर शेख नुर वय २२ वर्षे रा.गौसकालनी परभणी, शेख आसीफ अब्दुल रऊफ वय ३५ वर्षे चाकुर जिल्हा परभणी, सुधाकर नागोराव वाघमारे वय ६५ रा.पोकर्णी या.बिलोली, वैभव विनायक राहेगावकर वय ३५ विशाल नगर नांदेड, घाळप्पा चंद्रकांत मडीवाळ वय ३५ वर्षे, शितल घाळप्पा मडीवाळ वय २९ वर्षे, विजय घाळप्पा मडीवाळ वय ५ वर्षे सर्व राहणार हुलसुर जिल्हा बिदर येथील रहिवासी आहेत.

अपघातातील जखमी प्रवाश्यावर देगलूर येथील उप जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आली असून जखमींना डॉ. गायकवाड, संजय लाडके हे उपचार करीत आहेत. कर्नाटक बसचा चालक घटनास्थळावरून फरार झाला सदरील घटनेची माहिती मिळताच देगलूर पोलीसांनी तात्काळ घटना स्थळी भेट देवून पुढील चौकशी करत आहेत तर पोलीसांच्या नियोजना अभावी लेंडी नदीच्या पुलाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहणाचे प्रचंड रांगा लागल्याने एक तास वाहतूक ठप्प झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker