राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्या नायगांव तालुका सरचिटणीसपदी किरण वाघमारे

New Bharat Times नेटवर्क
नायगाव:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्या नायगांव (खै.) तालुका सरचिटणीसपदी औराळा येथिल मा.ग्रा.पं.सदस्य किरण शंकरराव वाघमारे यांची आज नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगांवकर यांच्या मान्यतेने तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी सदर नियुक्ती केली.

ऑगस्ट क्रांतीदिन, आदिवासी दिन व दिवंगत मा.आ.बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या जयंतीनिमित्त आज दि.९ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी आपल्या दारी जनसंपर्क अभियानात कुंटूर येथे प्रदेश सरचिटणीस गजानन पांपटवार, राष्ट्रवादी किसान सभेचे माजी प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मणराव मा.भवरे व तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांच्या उपस्थितीत त्यांची नियुक्ती जाहीर करण्यात येऊन त्यांच्याच हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
दिवंगत मा.आ.बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या स्मृतिस्थळी गोरठा ता.उमरी येथे पुष्प अर्पित करुन नियुक्तीनंतर अभिवादनही करण्यात आले. किरण वाघमारे यांच्या नवनियुक्तीनंतर त्यांचे उमरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष बापूसाहेब देशमुख गोरठेकर, नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक कैलासभाऊ बापूसाहेब देशमुख गोरठेकर, गणेशराव गाढे गुरुजी यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.
यावेळी तालुका उपाध्यक्ष बालाजी कदम कुंटूरकर, नायगांव शहराध्यक्ष संजय पाटील चव्हाण, नरसी शहराध्यक्ष दिनेश सुर्यवंशी, बाळू गायकवाड आदींची उपस्थिती होती.



