रिपाइं आठवले व्यापारी आघाडीच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रुग्णांना फळे वाटप

New Bharat Times नेटवर्क
नायगाव :- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रिपाइं आठवले गट व्यापारी आघाडीच्या वतीने ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे गरजू रुग्णांना फळे वाटून साठे जयंती साजरी करण्यात आली व अभिवादन करण्यात आले. रिपाइं आठवले गटाचे व्यापारी आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष धम्मदिप भद्रे कांडाळकर यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी प्रत्येक महामानवाची जयंती विविध उपक्रमाने साजरी केली जाते.

गेल्या दोन-तीन वर्षापासून व्यापारी आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष धम्मदिप भद्रे कांडाळकर यांनी मोठ मोठे उपक्रम राबवून समाजकार्य करत महामानवाचे विचार तळागाळा पर्यंत पोहोचण्याचे काम करीत असतात. याही वर्षी भद्रे यांनी ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे रुग्णांना फळे वाटून साठे जयंती केली साजरी.
यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोनकांबळे साहेब, वैद्यकीय अधिकारी डॉ.बोकारे साहेब, रिपाइं आठवले गटाचे व्यापारी आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष धम्मदिप भद्रे कांडाळकर, पत्रकार किरण वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र रेड्डी व हॉस्पिटल मधील सर्व सिस्टर स्टॉप मोठ्या संख्येने उपस्थित होते .



