ताज्या बातम्यानांदेडबिलोली
कत्तल करण्यासाठी 26 जनावरे ट्रक मध्ये वाहतूक करणाऱ्या प्रकरणातील फरार असलेल्या तिस-या आरोपीला कुंडलवाडी पोलिसांकडून अटक

कुंडलवाडी :- कुंडलवाडी –धर्माबाद रोडवरील शेळगांव (थडी) येये दि. ७ जुलै रोजी कुंडलवाडी पोलिसांनी पाठलाग करुन कत्तलीसाठी २६ जणावरे ट्रक मध्ये तेंलगाण्याकडे नेत असताना दोन आरोपी रशीद मोहमंद करीमोदीन रा.इस्लामपुर तहसिल मालपुर जिल्हा टौंक राजस्थान, खयुम जुम्माखान वय ३६ रा.राजस्थान या दोन आरोपीनाअटक केली होती.
या ट्रक मधून फरार असलेल्या तिसरा आरोपी इमरान मियाँसाब खुरेशी (20) रा.छोटी गल्ली बिलोली यास शेळगाव ते बामणी थडी रस्त्यावर नऊ जुलै ८ जुलै रोजी मध्यरात्री अटक करण्यात आली आहे.अशी माहिती कुंडलवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिली आहे.



