ताज्या बातम्यानांदेडनायगांव

ताकबीड येथील शेतकऱ्याचे नुसकान भरपाईसाठी तहसीदारांना निवेदन

New Bharat Times नेटवर्क

नायगाव:- अतिवृष्टीने शेतीचे झालेल्या नुकसानीचे भरपाई मिळवण्यासाठी मौ. ताकबीड येथील शेतकरी बांधवांनी तहसील कार्यालय नायगाव येथे तहसीलदार महोदयांना निवेदन देऊन परिस्थिती अवगत करून दिली.दिनांक २७ ,२८ आणि २९ ऑगस्ट रोजी सर्वदूर मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. ताकबीड येथे अक्षरशः ढगफुटी सारखी परिस्थिती निर्माण झाली. निवेदनकर्ते निळकंठ ताकबीडकर यांनी सांगितले गावाच्या दोन्ही बाजूने दोन वेगवेगळ्या नद्या वाहतात यात प्रचंड पाण्याच्या प्रवाहामुळे शेतजमीन पिकासह खरडून गेली. शेतीच्या उपयोगी सिंचन साहित्य इतरही वस्तू महापुरात वाहून गेल्या.वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे पाणी गावात शिरले आणि घराचे नुसकान झाले.

यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना या अतिवृष्टीमुळे मोठ्या नुसकानाला समोर जावे लागत आहे.याची तीव्रता जाणून शेतकऱ्यांनी तालुक्यातील सर्वात जास्त नुसकान झालेल्या गावामध्ये ताकबीडचा समावेश आहे म्हणून सर्व नियम अटी बाजूला ठेऊन शेतकऱ्यांना शासनाने मदत करावे या आशयाचे निवेदन विशेषतः तरुण मंडळीने प्रशासनाला दिले.

या निवेदनावर सर्वश्री निळकंठ ताकबीडकर, कपिल कुरे, शंकरराव मंडलापुरे, श्यामराव कुरे, शिवाजी कुरे, आनंदराव कुरे, केशव पांडागळे, बालाजी मंडलापुरे, रवी कुरे, केदार कुरे, विश्वाभर गोरे, दिपक वरवटे, नवनाथ गोरे, चंद्रकांत वरवटे, गजानन कनके, गोरख वरवटे,पवन टेकाळे, नवनाथ कुरे,मन्मथ गंगातीरे, सुरज मंडलापुरे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker