नायगाव : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकारणाचा केंद्रबिंदू सोशल मिडीया ठरला आहे. सोशल मिडीयातून ‘इच्छुक’ उमेदवारांच्या समर्थकांनी व ‘भावीं’नी सोशल मिडीयावर अक्षरशः धुमाकूळ घातला असून. आमचा नेता अमुक गटातून लढणार तर भावी आता आरपार ची लढाई लढण्याचे दावे करत आहेत.
मागच्या काही वर्षापासून सोशल मिडीया हे प्रचार व प्रसाराचे अतिशय वेगवान माध्यम बनले आहे. कुठलीही माहिती संघटना असो की आपल्या आपल्या व्यक्तींना काही क्षणात पुरवण्यात येत आहे. त्यामुळे या सोशल मिडीयाचा वापर प्रचंड वाढला आहे. विविध समाजाचे आरक्षणाचे मोर्चे, आंदोलन व सभा यासाठी त्या त्या समाजाचे नेते कार्यकर्ते माहीतीची देवाणघेवाण करण्यासाठी वापर होत आहे तेवढाच समाज विघातक कृत्यासाठी वापर होत आहे पण आरक्षणाच्या काही क्षणातच राजकारणाचा केंद्रबिंदू सोशल मिडीया बनला आहे.
मराठा आरक्षणानंतर राजकारणात भविष्य शोधण्याचा तरुणाई मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत त्यामुळे प्रत्येकाचे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षणाकडे लक्ष लागले होते. त्यामुळे आरक्षणाची सोडत होताच सोशल मिडिया राजकारणाचा प्लाटफार्म बनला आहे. नवखे असणारे इच्छूक स्वत:च स्वतःचे बँनर तयार करुन फेसबुक, व्हाटसप, व्हाटसप स्टेटस ठेवत आहेत आणि इंस्टाग्रामवर टाकत आहेत.
एवढी दिवस समाज सेवा केली, प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी झालो आता जनतेचा आशिर्वाद पाहीजे असा मजकूर टाकत आहेत. यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे तयार केलेले बँनर हे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गणातील आपापल्या समर्थकांना हितचिंतकांना पाठवून आपल्याला आता तर संधी मिळाली आता माघार नाही अशी काँमेंट करण्यात येत आहेत.
एकीकडे भावी व इच्छूक सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत असताना आजी माजी सदस्यांचे समर्थक आणि ज्यांना संधी मिळेल आसे वाटत आहे अशा नेत्यांचे समर्थक तर भाऊ, दादा, भाभी, ताई आमचा नेता फिक्स सदस्य अशा आशयाचे पोस्ट टाकत आहेत. भावी व इच्छूकांमुळे सोशल मिडिया वापरणारे अक्षरशः वैतागून गेले आहेत.