ताज्या बातम्यानांदेडहदगाव

हदगावजवळ तिहेरी अपघात : साफ्टवेअर इंजिनिअरसह दोघांचा मृत्यू

New Bharat Times नेटवर्क

हदगाव : तुळजापूर ते नागपूर या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. काम सुरु असल्याने वाहण धारकांना पर्यायी रस्ता देणे आवश्यक होते. मात्र महामार्गाच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या हलगर्जीपणामुळे तिहेरी अपघात झाला. यात दोन जागीच ठार झाले तर अन्य आठ जन गंभीर जखमी झाल्याची घटना दि. 18 आक्टोबर रोजी तालुक्यातील भानेगाव फाट्याजवळ घडली.

राष्ट्रीय महामार्ग क्र 361 चा हदगाव शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या भानेगाव फाट्याजवळ महामार्गातच्या डागडूजीसाठी फिरणाऱ्या वाहनाच्या व महामार्गाच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे जेसीबी व नांदेड वरून आर्णीकडे जाणाऱ्या आयशर व चाकूर वरून चंद्रपूर कडे जाणाऱ्या अशा तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला.

या अपघातात मनोज रामराव देगुरे (24) व मंजुषा देवदास आईलवार(37) या दोघांचा जागीच मृत्यू झाला असून पियुष देविदास आईलवार (42) मंजुषा निळकंठ असेवाढ (40) रामराव देगुरे (60), प्रतिभा देगुरे (57) दत्तात्रेय अंकुटे (25), निधी आसेवाड (14), शरयू असेवाड (7) सर्व रा. लातूर तसेच आयशर चालक शाहरुख खान (34) रा. खंडवा मध्य प्रदेश हा गंभीर जखमी झाले आहे.

या अपघाताची माहिती कळताच अंकुश गोदजे, बालाजी ढोरे, राजु तावडे, गजानन देवसरकर, मिलीद पाईकराव, गंगाधर काळे, शंकर जळके, अनिल देशमुख, शुभम गलांडे यांनी तात्काळ मदत करत जखमींना उपजिल्हा रुग्णालय हदगाव येथे दाखल केले. रुग्णालयात डॉ प्रदीप स्वामी, डॉ. दादाजी ढगे, डॉ. बालाजी पोटे, यांनी उपचार केले.

काही गंभीर जखमींना नांदेड येथे हलविले. महामार्गाची डागडुजी चे काम चालू असेल तर फलक लावणे गरजेचे असते परंतु महामार्गाच्या कर्मचाऱ्यांना याची गांभीर्य घेतले नाही, अपघात हा महामार्गाच्या ढिसाळ व व हलगर्जीपणामुळे घडला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेची माहिती कळतच पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी तात्काळ धाव घेतली व महामार्ग येथे वरील वाहतूक सुरळीत केली.

देगूरे परिवार हा चंद्रपूर येथे सॉफ्टवेअर इंजिनियर मनोज देगूरे यांच्यासाठी मुलगी पाहण्यासाठी चालले होते. पण वाटेतच काळाने घाला घातला त्यात सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या मनोजचा अपघातात मृत्यू झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker