नांदेड तहसीलच्या टीमची अवैध वाळू उत्खनना विरोधात पुन्हा मोठी कारवाई…

New Bharat Times नेटवर्क
नांदेड : तहसील कार्यालयाने दि. 3 डिसेंबर रोजी अवैध वाळू उपसा करणाऱ्यांच्या विरोधात पुन्हा एकदा धाडसी कारवाई करुन बोरगाव तेलंग परिसरात 3 बोटी 5 इंजिन जप्त करण्यात आले. त्यापैकी 3 बोटी स्फोटकाच्या सहायाने नष्ट करण्यात आल्या आहेत तर जप्त केलेले इंजिन लिंबगाव पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहेत.

नांदेड तहसील कार्यालयाचे दि. 03 डिसेंबर रोजी मा जिल्हाधिकारी नांदेड श्री.राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ, तहसीलदार श्री.संजय वारकड यांच्या निर्देशानुसार नायब तहसीलदार श्री स्वप्निल दिगलवार मंडळ अधिकारी श्री.कुणाल जगताप मोहसीन सय्यद ग्राम महसूल अधिकारी माधव भिसे, बरोडा, संजय खेडकर, महेश जोशी, मनोज जाधव, तलाठी मारोती श्रीरामे, मनोज सरपे, महसूल सेवक श्री.बालाजी सोनटक्के, शिवा तेलंगे.
महसूल पथक परिसरामध्ये पहाटे 5.00 वाजता अवैध रेती उत्खनन प्रतिबंधासाठी विष्णुपुरी, कल्लाळ, भागामध्ये गस्तीवर असताना अवैध रेती उत्खनन करणारे इंजिन व बोटी नदीमधून पळून गेल्या त्याचा पाठलाग करून बोरगाव तेलंग परिसरामध्ये गोदावरी नदीमध्ये 3 बोट व 5 इंजिन पकडण्यात आले. पथकाने मजुरांच्या साह्याने 3 बोटी स्फोट करून नष्ट केले. तसेच 25 तराफे जागेवरच जाळून नष्ट करण्यात आले. 5 इंजिन जप्त करून पोलीस स्टेशन लिंबगाव येथे लावण्यात आले. असे एकूण 49 लाख किमतीचा मुद्देमाल जाग्यावरच स्फोट करून नष्ट करण्यात आले व 20 लाख रु चे इंजिन जप्त करण्यात आले.
नांदेड शहराच्या आजुबाजूला नियमितपणे पोलीस आणि महसूल विभाग कारवाई करुन वाळू माफीयांना दणके देत आहेत मात्र मुदखेड, उमरी, धर्माबाद बिलोली व देगलूर भागात मात्र महसूल आणि पोलीस यंत्रणा कारवाई करत नसल्याने उलटसुलट चर्चा होत आहे.



