सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त कुंडलवाडी पोलीस ठाणेतर्फे उद्या एकता रँलीचे आयोजन

कुंडलवाडी :- नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे कुंडलवाडी पोलीस स्टेशन यांच्यामार्फत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त दि.३१ ऑक्टोबर रोजी कुंडलवाडी येथे एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र मांजरमकर यांनी केले आहे.
सरदार वल्लभाई पटेल यांच्या दीडशे व्या जयंतीनिमित्त कुंडलवाडी पोलीस स्टेशन तर्फे दि.३१ आँक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता कार्ला फाटा रोडवरील नायरा पेट्रोल पंप येथे एकता रँली चे आयोजन करण्यात आले. पुरूषांसाठी ३ कि.मी. तर महिलांसाठी दिड किलोमीटर अंतर ठेवण्यात आले आहे. या रॅलीत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक येणाऱ्यांना आकर्षक सन्मानपत्र देण्यात येणार आहे.
या रॅलीत शहरातील सर्वच क्षेत्रातील महिला व पुरुषांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र मांजरमकर यांनी केले आहे.



