ताज्या बातम्यानांदेडनायगांव

नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा समन्वयक पदी डॉ.मीनल पाटील खतगावकर

प्रदेश सरचिटणीस भास्कर भिलवंडे, जिल्हा कार्याध्यक्ष अशोक पाटील मुगावकर, जिल्हा शहर कार्याध्यक्ष स.सरजीतसिंग गील यांची नियुक्ती

भगवान शेवाळे

नायगाव:- नांदेड जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जिल्हा समन्वयक पदी युवा नेत्या डॉ.मीनल पाटील खतगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगर परिषद निवडणूकीनंतर लगेचच महानगरपालिकेच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत आणि येणा-या नजीकच्या काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका जाहीर होणार आहेत. त्याअनुषंगाने नांदेड जिल्हयात समन्वयाची जवाबदारी पार पाडण्यासाठी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी जिल्हा समन्वयक म्हणुन डॉ.मीनल पाटील खतगावकर, प्रदेश सरचिटणीस म्हणुन भास्कर भिलवंडे आणि नांदेड जिल्हा ग्रामीण दक्षिण च्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी अशोक पाटील मुगावकर व नांदेड शहर जिल्हा कार्याध्यक्ष पदी माजी उपमहापौर स.सरजीतसिंग गील यांची नियुक्ती केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांनी तसेच मंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, लोहा-कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर या जिल्हयातील नेत्यांनी या कार्यकर्त्याना संधी दिल्याबदल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी सर्व वरिष्ठ नेत्याचे आभार मानले आहेत.

या पक्ष पातळीवरील नियुक्त्यामुळे येणा-या निवडणूक काळामध्ये नांदेड जिल्हयात पक्ष संघटन अधिक मजबुत होण्यासाठी योग्य वेळ साधल्याची प्रतिक्रिया ही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. डॉ.मीनल पाटील खतगावकर यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी नांदेड जिल्हयामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा ध्येयधोरणे, प्रचार, प्रसार, सदस्य नोंदणी आणि पक्ष संघटन मजबुत करुन नांदेड जिल्हयात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष नंबर एकचा पक्ष करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker