जवाहर नवोदय विद्यालयात” श्यामची आई” या एकपात्री नाट्य प्रयोगाने झाले विद्यार्थी मंत्रमुग्ध

मोरे मनोहर
किनाळा :- जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर जिल्हा नांदेड येथे पीएम श्रि आय के एस- अंतर्गत दिनांक 20 डिसेंबर 2025 शनिवार रोजी श्यामची आई या एकपात्री नाटकाचं आयोजन जबाहर नवोदय विद्यालय याचे प्राचार्य सुहास मांडले यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले होते या एकपात्री नाटकाचा नवोदय व परिसरातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी आनंद घेतला यावेळी अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येत्या 24 डिसेंबर 2025 रोजी पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी यांची जन्म जयंती आहे या अनुषंगाने 20 डिसेंबरला पंचायत समिती सेलू जिल्हा परभणी येथील विस्तार अधिकारी तथा प्रसिद्ध नाटककार मधुकर उमरीकर आणि त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी सय्यद शेख विस्तार अधिकारी परभणी यांनी श्यामची आई या नाटकाचे एकपात्री नाटक विद्यार्थ्यांसाठी सादर करून विद्यार्थ्यांना साने गुरुजी तथा त्यांच्या आईचे त्यांच्यावर केलेले संस्कार याबद्दल विद्यार्थ्यांना नाटकीय रूप देऊन मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमाला बिलोली तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री बी एम पाटील यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक सुद्धा सहभागी होते यामध्ये जिल्हा परिषद रामतीर्थ जिल्हा परिषद किनाळा येथील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला हा कार्यक्रम चालू असताना विद्यार्थी हे मंत्रमुग्ध होतेच परंतु श्याम आणि श्यामची आई नाटकीय पात्र पाहाताना अनेक विद्यार्थी बऱ्याच वेळा हसले सुद्धा आणि बऱ्याच वेळा रडले सुद्धा त्यामुळे आई हा विषय सर्वविद्यार्थ्यांसाठी मोलाचे तसेच हृदयाजवळचा आहे हे सर्वांना कळंले आणि आईचे संस्कार हे किती महत्त्वाचे आहेत हे या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले गेले.
याप्रसंगी या एकपात्री नाटका सोबतच बाल विद्या मंदिर हायस्कूल परभणीचे शिक्षक श्री सोनोने समुपदेशक हे सुद्धा उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी आणि आपल्या अंगभूत कलागुणांना कसा वाव द्यायचा, आपली पर्सालिटी कशी तयार करायची याबद्दल विस्तृत असे मार्गदर्शन केले तर इतर तज्ञ म्हणून आकाशवाणी परभणी च्या उदघोषक श्रीमती सीमंतिनी कुंडीकर यांनी विद्यार्थ्यांना आर जे कसे बनावे याविषयी व्याख्यान दिले.
जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर जिल्हा नांदेड हे प्रत्येक महिन्यात विद्यार्थ्यांसाठी अनेक मान्यवरांना बोलवून विविध कार्यक्रम आयोजित करतात जेणेकरून विद्यार्थ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन भेटत असते यासाठी सर्व पालक वर्ग व विद्यार्थी समाधानी आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य श्री सुहास मांडले तसेच विद्यालयाचे शिक्षक हे अहोरात्र परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करत असतात हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षेकत्तर कर्मचारी तसेच नवोदय विद्यालयातील सर्व मेस स्टाफ यांनी विशेष कार्य केले.



