जेष्ठ पत्रकार शेषेराव कंधारे यांचा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारांता पुरस्काराने गौरव

New Bharat Times नेटवर्क
नायगाव :- नायगाव तालुक्यातील धुप्पा येथील जेष्ठ पत्रकार तथा दैनिक लोकपत्र चे नायगाव तालुका प्रतिनिधी शेषेराव लक्ष्मण कंधारे यांचा दि.१० मे रोजी बिड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारांता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दैनिक लोकनेताच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जगप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने, अभिनेत्री मेघना झुझूम, बाप आयटी कंपनीचे संस्थापक रावसाहेब घुगे, डॉ.मयंक गांधी (संस्थापक GVT),जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात,जिल्हा परिषदेचे सीईओ जितीन रहेमान, पोलीस निरीक्षक नाचेन, नगराध्यक्षा पद्यश्रीताई धर्माधिकारी यांच्या हस्ते शाल, पुष्पहार, ट्रॉफी व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
दैनिक लोकपत्र चे नायगाव तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेले शेषेराव कंधारे यांनी गेल्या अठरा वर्षापासून ग्रामीण भागातील सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालवत पत्रकारितेत वेगळी ओळख निर्माण केली आहे. पत्रकार शेषेराव कंधारे यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत. दैनिक लोकनेता परिवाराच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारांता पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला. राज्यस्तरीय मिळालेल्या या सन्मानाबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.



