ताज्या बातम्यादेगलुरनांदेड

देगलूर पोलिसांनी गुटखा पकडला : कारसह ९ लाखाचा मुद्देमाल जप्त : दोन आरोपी ताब्यात

अंकुशकुमार देगावकर

देगलूर : मिळालेल्या माहितीनुसार देगलूर पोलीसांनी पाठलाग करुन तालुक्यातील वझरगा येथे डिझायर कार अडवून तपासणी केली असता कारमध्ये विमल गुटखा व अन्य गुटख्याचे पाकीट आढळून आले. गुटखा व कारसह ९ लाखाचा मुदजप्त करुन दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. सदरची कारवाई दि. ३० जुन रोजी सायंकाळी सात वाजता करण्यात आली.

तेलंगणा आणि कर्नाटक मधून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होते. याची गुप्त माहिती देगलूर पोलीसांना मिळाल्यानंतर सांगितलेल्या नंबरची पांढऱ्या रंगाची कार देगलूरवरुन काल सायंकाळी नरसीकडे निघाली होती. सदर कारचा देगलूर पोलिसांनी पाठलाग करुन वझरगा येथे स्विफ्ट डिझायर कार (एम.एच.१२-के.एन. ६०३९) अडवून कारच्या तपासणी केली. यात १५ पोते केशरयुक्त विमल पान मसाला ज्याची किंमत १,४१,००० व व्ही. १ बीग टोबॅकोअसे नाव असलेले २० पुढे ज्याची किंमत एकूण ९ हजार रुपये तसेच रंजनीगंधा पान मसाला असे नाव असलेला एकूण ३६ हजारांचा व सिंगनीचर पान मसाला असे नाव असलेले एकूण २२४ पुढे ज्याची किंमत १,३४,००० रुपये असा एकूण ३,२०,४०० रुपयांचा माल तसेच पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार असा ९ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर कारमधील शेख साजीद शेख जलाल बागवान (वय ३८), शेख अख्तर शेख गफार बागवान (दोघेही रा. सदर बाजार जामा मस्जीदजवळ, हिंगोली) यांना ताब्यात घेण्यात आले.

सदरची कारवाई पोलिस निरीक्षक मारुती मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील कृष्णा तलवारे, साहेबराव सगरोळीकर, वैजनाथ मोटारगे, राजवंत सिंघ बुंगई, रंजीत मुदिराज यांनी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker