ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

इंस्टाग्रामवर आई वडीलाबद्दल भावनिक पोस्ट टाकून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आत्महत्या

New Bharat Times नेटवर्क

ईस्लापूर : महाविद्यालयीन तरुणाने दोन तासापूर्वी आई वडीलाबद्दल भावनिक पोट ठेवली नंतर गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना परोटी (ता. किनवट) येथे दि. 31डिसेबर रोजी दुपारनंतर उघडकीस आली. रानोजी विलास ऐनलेवाड वय 20 असे मृत महाविद्यालयीन तरुणाचे नाव असून तो नांदेड येथे शिक्षण घेत होता.

आत्महत्या करण्यापूर्वी रानोजी याने भावाला नांदेडला जायचे आहे असे सांगितल्याने भावाने त्याला बुधवारी दुपारी इस्लापूर येथे सोडून परत गेला. मात्र इस्लापूर येथून तो पुन्हा सहस्त्रकुंड येथे आला व येथील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या पळसाच्या झाडाला स्वतःच्या दस्तीने गळफास घेतल्याचे दि. 31 डिसेंबर रोजी आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नातेवाईकांच्या उपस्थितीत घटनास्थळीचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ईस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला. वृत्त लिहिपर्यंत मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नव्हते पुढील तपास येथील पोलीस करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली .

रानोजी ऐनलेवाड हा बी.एस्‌सी. प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता तो नांदेड येथे शिक्षण घेत होता. विशेष म्हणजे मृत्यूपूर्वी त्याने स्वःच्या मोबाईल इंस्टाग्रामवर “आई, बाबा आज तुमची खूप आठवण येत आहे,मी घरी आहे . आणि तुम्ही नाही.‌‌.. लवकर या, मी वाट बघेन तुमची ” अशा शब्दांत भावनिक पोस्ट त्यांनी गळफास घेण्यापूर्वी दोन घंटे टाकली होती. त्याचे आई-वडील कामानिमित्त तेलंगणा राज्यात गेले असल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस नि।मेश भोसले व पोलिस उपनिरीक्षक कोमल कांगणे हे तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker