कुंडलवाडी शहरात कडाक्याच्या थंडीत नववर्षाचे जल्लोषात स्वागत ; सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांचा चोख बंदोबस्त

कुंडलवाडी :- २०२५ या मावळत्या वर्षाला हर्षोल्हासात निरोप देत २०२६ या नववर्षाचे स्वागत कुंडलवाडी शहरात फटाक्यांच्या आतषबाजीने करण्यात आले. सर्वत्र पार्ट्यांचा जल्लोष तर दुसरीकडे शहरातील मंदिरात अनेक धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रम घेत नववर्षाचे स्वागत करण्यात आले.सोशल मीडियावर नववर्ष शुभेच्छांंचा अक्षरशः वर्षाव झाला. मध्यरात्री ठीक बारा वाजता ‘हॅपी न्यू इअर’चा जल्लोष झाला.शहर व परिसरात कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
नववर्ष स्वागतासाठी तरुणाई गत दोन दिवसापासून तयारी करत होते. भारत या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे उत्साहात फटाक्याने स्वागत अशा या उत्साही वातावरणात २०२५ या मावळत्या वर्षाला निरोप देत २०२६ या नववर्षाचे स्वागत व जल्लोष नागरिकांंनी मध्यरात्री केले.थंंडी वाढली असतानाही त्याची पर्वा न करता सर्वच जण नववर्ष स्वागतात रममाण झाले होते. संगीतमय कार्यक्रम, फटाक्यांची आतषबाजी आणि पार्ट्यांची रेलचेल रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी युवापिढी रस्त्यावर उतरली होती. मध्यरात्री ठीक बारा वाजता ‘हॅपी न्यू इअर’चा जल्लोष सुरू झाला. एकमेकांना नववर्ष शुभेच्छा देण्याची सोशल मिडीयात स्पर्धा झाल्याचे चित्र दिसून आले.



