नायगाव रुग्णालयात डॉ.लोंढे यांच्या प्रयत्नानेगर्भवती महिलेनी दिला सुखरूप बाळाला जन्म

मोरे मनोहर
किनाळा :- आजही अनेक शासकीय रुग्णालयात अनेक रुग्णांना योग्य पद्धतीने पाहिले जात नाही असे बोलले जाते मात्र नायगाव येथील शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र लोंढे व त्यांच्या सहकार्याने केलेल्या प्रयत्नामुळे नांदेडला जावे लागणाऱ्या एका गर्भवती महिलेचे बाळंतपण सिजर न करता यशस्वी करण्यासाठी योग्य पद्धतीने प्रयत्न केल्याने नवीन वर्षाच्या पहिल्या रात्री गर्भवती महिलेने अगदी सुखरूप बाळाला जन्म दिले.
अधिक माहिती अशी की सौ.निकीता अशोक वाघमारे मौजे तुळशी तालुका महाडा जिल्हा सोलापूर येथील महिला आपल्या माहेरी मोजे किनाळा तालुका बिलोली येथे बाळंतपणासाठी आले असता त्यांना दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी आठच्या सुमारास नायगाव येथील शासकीय रुग्णालयात 102 ची ॲम्बुलन्स करून नेले असता येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र लोंढे यांनी सदरील महिलेची योग्य तपासणी केले असता सदरील महिलेचा बिपी कमी जास्त होत असताना सदरील महिलेची योग्य व सिजर न करता बाळंतपण करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले यामुळे सदरील महिला निर्विघ्न पणे सुखरूप सुमारे पावणे तीन किलो वजनाच्या बाळाला सुखरूप जन्म दिले.
हे बाळंतपण सुखरूप व यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र लोंढे , व त्यांचे सहकारी सौ. सुधाताई कांबळे, आणि मनीषा हिंमगिरे यांनी विशेष परिश्रम घेतले असल्याने शासकीय रुग्णालयात गर्भवती महिलांची खाजगी रुग्णालयापेक्षा शासकीय रुग्णालयात योग्य सुविधा पुरवली जाऊ शकते हे नायगाव येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवल्याने गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांनी येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले.



