ताज्या बातम्यानांदेडबिलोली

शंकरनगर येथील एटीएम फोडुन फरार झालेले आरोपी अडकले रामतीर्थ पोलिसांच्याजाळ्यात

मोरे मनोहर

किनाळा :- नांदेड- देगलूर राज्य महामार्गावर रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले एसबीआय चे एटीएम एका वर्षात दोनदा फोडून चोरटे लाखो रुपये लंपास करण्यात यशस्वी झालेले सदरील गुन्ह्यातील आरोपी दि. 13 फेब्रुवारी रोजी रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या जाळ्यात अडकले असून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनी विक्रम हराळे हे पुढील तपास करत असून आहेत. नांदेड -देगलुर राज्य महामार्गावर शंकरनगर तालुका बिलोली येथे रामतीर्थ एसबीआयचे असलेले एटीएम 19 सप्टेंबर 2024 रोजी आणि 24 ऑक्टोबर 2025 रोजी एका वर्षात दोनदा अज्ञात चोरांनी गॅस कटरने कापून एटीएम मधे असलेले लाखो रुपये चोरून नेण्यात चोरटे यशस्वी झाले होते .

19 सप्टेंबर 2024 रोजी एटीएम मध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा वर स्प्रे मारून गॅस कटरच्या साह्याने एटीएम कापून सुमारे 20 लाख 43 हजार रुपये लंपास करण्यात आले होते याच पद्धतीने नंतर 24 ऑक्टोबर 2025 रोजी पूर्वीप्रमाणेच एटीएम कापून एटीएम मधील लाखो रुपये लंपास केल्याने शंकरनगर येथे एका वर्षात दोनदा एटीएम फोडून लाखो रुपये अज्ञात चोरट्याने चोरल्याने सामान्य नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी एटीएम मॅनेजर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलिसात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून चोरांचा तपास करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली चार पथक रवाना करण्यात आले होते.

24 ऑक्टोबर रोजी एटीएम कापून चोरी करणारे आरोपी रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनी विक्रम हराळे यांनी संभाजीनगर येथून अटक केली असून रामतीर्थ पोलीस स्टेशन मध्ये असलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर 313/2025 प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर पुण्यातील आरोपी आरोपी 1) मोहम्मद कैफ नजमुद्दीन वय 21 वर्षे राहणार उलेता तालुका फिरोजपूर जिल्हा नुहू राज्य हरियाणा आणि 2) आझाद इसरू खान व 24 वर्षे राहणार झारोकारी तालुका पुन्हाना जिल्हा नुहू राज्य हरियाणा या दोन आरोपींना संभाजीनगर येथे पकडून पोलिसांच्या जाळ्यात अडकवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker