माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण – माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी केली पाहणी

भारत जोडो यात्रेची जय्यत तयारी सुरु... उर्वरित मार्गांची पण करणार पाहणी !

118

गंगाधर गंगासागरे

नांदेड :- काँग्रेस नेते खा.राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा नोव्हेंबर महिण्याच्या पहिल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यात येत असून ज्या मार्गावरुन ही यात्रा जाणार आहे, त्या मार्गाची स्थानिक पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी पाहणी केली होती. या मार्गावरील यात्रेच्या पूर्वतयारीची पाहणी आता माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह राज्य व राष्ट्रीय पातळीवरील दिग्गज नेत्यांनी आज येथे केली.

खा.राहूल गांधी यांचा नांदेड जिल्ह्यात सहा दिवस मुक्काम राहणार आहे. नोव्हेंबर महिण्याच्या पहिल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यात आगमन होणारी ही यात्रा देगलूर, शंकरनगर, कृष्णूर, जवाहरनगर तुप्पा, नांदेड व अर्धापूर या ठिकाणी मुक्कामी राहणार आहे. या यात्रेच्या पूर्वतयारीची पाहणी करण्यासाठी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचे एक शिष्टमंडळ नांदेड जिल्ह्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे.

जिल्हा दौऱ्यावर आलेल्या शिष्टमंडळामध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा नेटा डिसुजा, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री यशोमती ठाकुर, माजी मंत्री नसीमखान, माजी मंत्री रमेश बावगे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे चिटणीस संपतकुमार, आशिष दुआ, सोनम पटेल, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, सरचिटणीस विनायक देशमुख, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, सेलूचे नगराध्यक्ष मुकेश बोराडे, सुरेश नागरे, तौफिक मुलानी यांचा समावेश आहे.

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह सर्व मुक्कामांच्या स्थळांची पाहणी केली. त्यानंतर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या काँग्रेस नेत्यांना यात्रेच्या तयारीची स्थळ पाहणीच्या माध्यमातून माहिती दिली. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची उपाध्यक्ष व विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ.अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डी.पी.सावंत, आ.जितेश अंतापूरकर, माजी आ.वसंतराव चव्हाण, माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, जिल्हा काँग्रेसजे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी, नगरसेवक बालाजीराव जाधव, प्रवक्ते संतोष पांडागळे, समन्वयक नारायण श्रीमनवार, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष शशिकांत क्षीरसागर, दडू पुरोहित यांचा समावेश होता.

काँग्रेसचे शिष्टमंडळ नांदेड येथे मुक्कामी आहे. उद्या दि.2 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील उर्वरित स्थळांची पाहणी करणार असून हे शिष्टमंडळ त्यानंतर हिंगोलीकडे रवाना होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.