नरसीत सोमवारपासून डे-नाईट क्रिकेटचे खुले सामने

नायगाव : गत वर्षीप्रमाणे याही वर्षी नरसीत क्रिकेटचे डे-नाईट सामनेचे १२ जानेवारी पासून आयोजन करण्यात आले असून प्रथम पारितोषिक ३३,३३३ हजार ( हाजी मैनोंद्दिन कुरेशी ) द्वितीय पारितोषिक २२,२२२ रुपये, (ग्रीन स्टार मोबाईल शॉप ) तृतीय पारितोषिक १११११हजार रुपये, (लाला कुरेशी )चतुर्य बक्षिस ५५५५ रुपये ( भारत मेडिकल ) उत्कृष्ट पारितोषिक खेळाडूंना देणार असल्याची माहिती आयोजक एम.के.फायटर्स क्लब कमिटीनी दिली आहे.
नरसी येथील हजरत सय्यद खाकीसाब वली ह्या ऊरसा निमित्त भव्यदिव्य डे नाईट क्रिकेटचे शॉट बॉड्री चषक १२ जानेवारी दुपारी तीन वाजता नायगाव रोडवरील ( गांधी नगर ) भव्यदिव्य ग्राऊंडवर १२ तारखी पासून शुभारंभ होत असून बेस्ट हॉट्रिक,मॅन ऑफ दी सिरीज फायनल मॅन ऑफ मॅच सह असंख्य बक्षीस वितरण होणार असून नरसीत दरवर्षीप्रमाणे होणाऱ्या डे नाईड क्रिकेट स्पर्धे पाहण्यासाठी गुलाबी थंडीत जवळपास तीन हजारो युवक ह्या स्पर्धेचे आनंद घेतात हे विशेष.
नरसी येथे भव्यदिव्य डे नाईट क्रिकेट सामने आयोजक हाजी मेनोद्दीन कुरेशी, राजू वाघमारे, शेख सोहेल, शेख सलीम, शेख अहेमद, यांनी ह्या खुले सामन्यात जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवाव असे आवाहन केले आहे



