महावितरणचा धक्कादायक कारभार उघड ; सरपंचांवर वीज चोरीचे गुन्हे?
गावचाप्रश्न मांडल्याचा सूड म्हणून आमच्यावर कारवाई होत आहे.” महावितणराच्यां आभियंताने डोंगर पोखरून उंदीर काढले

New Bharat Times नेटवर्क
नायगाव :- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या नरसी शाखेचे अभियंता अजय वाळके यांनी अधिकारी पदाचा गैरवापर करून किनाळा व रामतिर्थ या दोन्ही गावांतील शेकडो लोकांना नोटीसतर दोघांवर निरपराध वीज ग्राहकांवर वीज चोरीचे खोटे गुन्हे दाखल केल्याचा गंभीर आरोप किनाळा गावचे सरपंच विठ्ठल माने व रामतीर्थ येथील सरपंच प्रतिनिधी हणमंतराव शकंरराव तोडे यांनी केला आहे.
सरपंच विठ्ठल माने यांनी सांगितले की, त्यांच्या नावावर असलेला वीज मीटर क्रमांक555230056198 कै.बापुराव सतुकां माने याच्यां नावे आहे ते नियमित असून ते दर महिन्याला वेळेवर वीज बिल भरत आहेत. तरीदेखील त्यांच्या नावावर वॉटर फिल्टरच्या नावाने सुमारे १ लाख १८ हजार रुपयांचे वीज चोरीचे बिल देण्यात आले आहे. प्रत्यक्षात त्यांच्या घरी कोणताही वॉटर फिल्टर नसल्याचा त्यांनी दावा केला आहे. दरम्यान, रामतीर्थ येथील सरपंच प्रतिनिधी व स्वस्त धान्य दुकानदार हणमंतराव शंकरराव तोडे यांनीही अभियंता अजय वाळके यांनी राजकीय द्वेषातून वीज चोरीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला आहे.
त्यांचा वीज ग्राहक क्रमांक नियमित असून ते दर महिन्याच्या २५ ते २६ तारखेदरम्यान वीज बिलाचा भरणा होत आहे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे स्वस्त धान्य दुकान अनेक वर्षांपासून घर क्रमांक २५१ घर नंबर मिटर क्रमांक 555300056999 पूर्वी कै. शंकरराव दशरथ तोडे यांच्या नावावर होता व वारसा हक्काने तो हणमंतराव तोडे बिल भरणा केला करतात संबंधित वीज मीटर देखील त्यांच्या नावावरच असल्याचे त्यांनी स्पष्ट सागितंले.
दोन्ही सरपंचांच्या मते, वीज चोरीचे बिल २४ व २६ नोव्हेंबर रोजी देण्यात आले, तर प्रत्यक्ष वीज चोरी आढळल्याचा दावा अभियंता वाळके यांनी २४ व २७ डिसेंबर रोजी करण्यात आला. म्हणजेच बिल आधी व चोरीचा निष्कर्ष नंतर काढण्यात आल्याने महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून हा प्रकार भोंगळपणाचा नमुना असल्याचा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
गावातील काही कामांसाठी लाईनमनकडे वेळोवेळी आर्थिक व्यवहार झाल्याचेही त्यांनी सांगितले असून त्यासंदर्भातील फोन-पे व्यवहाराचे पुरावे असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
दरम्यान, चुकीचे वीज बिल रद्द करून खोटे गुन्हे मागे घेतले नाहीत, तर महावितरण कार्यालयासमोर आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा सरपंच विठ्ठल माने सरपंच प्रतिनिधी यांनी दिला आहे.
याशिवाय किनाळा व रामतीर्थ गावातील शेतीपापाची व पाणीपुरवठा डीपी एम.एस.बि. विभागाला सुचना न देता परस्पर बदलणे, तसेच काही कनेक्शन न देता आर्थिक देवाणघेवाण करुन विज वापरण्याचा आरोप झाल्याचेही बोलल्या जात असे व . या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. तसेच देगलूर–बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांच्याकडेही ही बाब मांडण्यात आली होती. त्यामुळे सूडभावनेतून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप दोन्ही सरपंचांनी केला आहे.
तसेच या प्रकरणाची वरिष्ठांनी रितसर चौकशी करून अभियंता वाळके व विघुत साहयक, शिवाजी सुगावे, शेख.वाय.वाय, मारकवाड व खाजगी व्यक्ती याच्यांवर कारवाई करुन गावकऱ्यांमध्ये होत असलेली तीव्र नाराजी दूर करावी अशी मागणी होत आहे.



