अखेर… त्या वाळू माफियाला पोलिसांचा खो… आर्थिक तडजोडीची रंगली चर्चा
नाट्यमय घडामोडीतून कुंटूर ठाण्याचे सपोनि भोसलेंनी एस पी च्या आदेशाला दिली बगल…

सय्यद जाफर
नायगांव :-“रात्रीस खेळ चाले” च्या प्रकरणातून अवैध्यरित्या गोदापत्रातून काळ्या वाळूचा उपसा अन् त्याची वाहतूक करणाऱ्या वाळू माफियाच्या एका फसलेल्या हायवाला एस पी च्या आदेशाने कुंटूर पोलीसांनी दि १० मार्च रोजी मध्यरात्री नायगांव तालुक्यातील देगांव येथे पकडले.
परंतु एकीकडे एस.पी साहेबांच्या आदेशाचे पालन करत असल्याचा देखावा करून मोठ्या आर्थिक तडजोडीतुन नाट्यमय घडामोडीतून दुसऱ्या पळ मार्गाने त्या माफियाला वाचविण्याचाही पुरेपूर प्रयत्न कुंटूर पोलिसांनी केला. अन् एस पी च्या आदेशाला बगल देत वाळू माफियाला “खो” मिळाला. तो हायवा सुखरूप कायद्याच्या कचाट्यातून निसटला अशी चर्चा आता मोठ्या चवीने रंगल्या जात आहे.
नायगांव तालुक्यात आणि बाजुच्या तालुक्यात काळ्या वाळूचा अवैध उपसा व वाहतूक सुरूच असल्याचे ज्वलंत उदाहरण देगांव येथे दि १० मार्च रोजी रात्री १० : ३० वाजताच्या सुमारास काळ्या वाळूने खचाखच भरलेला MH 26 BE 3070 या क्रमांकाचा हायवा आला. आणि तो खाली करण्यापुर्वीच चिखलात फसुन बसला होता तेव्हा आला. रात्रीची वेळ असल्याने कोण बघणार या तोऱ्यत असणाऱ्या हायवा चालकाला व मालकाला महाग पडले होते.
या विषयाची माहिती नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनेश कुमार यांना कळाली. त्यांनी लगेच कुंटूर पोलीस ठाण्याचे फौजदार विशाल भोसले यांना त्या हायवावर कारवाई करण्याचे आदेश सोडले होते. साहेबांचे आदेश आल्यानंतरही सुमारे एक ते दोन तास घटनास्थळी येण्यास उशीर लावला. त्यावेळेसच सदरील हायवा जाग्यावर वाळू टाकून पळण्याचा प्रयत्न करत होता.
परंतु साहेबांनी दुसरा फोन केला अन् कान पिळल्यानंतर लगेच दहा मिनिटात ठाण्याचे कर्मचारी पल्लेवाड व कंधारे जाय मोक्यावर दाखल झाले. आणि अवैध वाळू वाहतूक करणाऱ्याचे मनसुबे उधळले. तेथून चालक-मालक दोघेही पसार झाले. ही घटना उघडकीस आल्याने खरोखरच काळ्या वाळूचा “रात्रीस खेळ चाले” याचा पर्दाफाश झाला होता.
त्यानंतर सदरील हायवा वर कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर सपोनि भोसले यांनी आपले कागदी घोडे नाचवत वाळू माफियाला वाचवण्यासाठी मोठी आर्थिक उलाढालीतुन प्रयत्न केल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. जमिनीवर सांडलेल्या साडेतीन ब्रास वाळूचा पंचनामा न करता फक्त हायवात दीडच ब्रास वाळू आहे.
त्याच्यावरच दंड आकारण्यात यावे असे पत्र तहसील कार्यालयाला दिल्याचेही चर्चा आहे. त्या साडेतीन ब्रास वाळूचा पंचनामा “ना पोलिसांनी केला ना महसुलने” याचा अर्थ काय निघतो असा सवाल ही उपस्थित होत आहे. एवढ्या मोठ्या हायवात फक्त दीडच ब्रासच वाळू नेण्यात येते का ? हा जावई शोध कोणी लावला ? हेही चर्चा मोठ्या चवीने रंगल्या जात आहेत.
हायवा वर गुन्हा दाखल होऊन तो कोर्टातून सोडून घेण्यासाठी या वाळू माफियाने बनावट पावत्याची जुगाडही लावली होती त्याबाबत “New Bharat Times ” मध्ये दि १२ मार्च रोजी बातमी मध्ये उल्लेखही करण्यात आला होता. ती बाब खरी ठरली. आणि पोलिसांच्या आर्थिक उलाढालीच्या सहकार्याने शेवटी त्या वाळू माफियाला “खो” मिळाला. आणि दुसरीकडे पोलिसांनी एस पी साहेबांच्या आदेशाला कुंटूर पोलिसांनी बगल दिल्याची चर्चा रंगत आहे.
अठरा दिवसानंतरही दंडाची नोटीस पाठवली नाही..
या सर्व नाट्यमय घडामोडींना १८ दिवसाचा कालावधी उलटल्यानंतरही नायगांवच्या तहसील कार्यालयाने बिलोली उपविभागीय अधिकाऱ्यांकडे त्या हायवावर दंड आकारण्यासाठी नोटीस न पाठवल्याने या चर्चेलाही पेव फुटले आहे.
यात तहसील कार्यालयाने संबंधित सज्जाचे तलाठी शिवकुमार मंगनाळे यांना जाय मोक्याच्या पंचनामा करण्याचे आदेश दिले असतानाही त्यांनी अद्यापही त्या वाळूचा पंचनामा केला नसल्याने या प्रकरणात संशयाला अधिक बळ मिळत आहे. दरम्यान, याबाबत तलाठी मंगनाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.



