ताज्या बातम्यानांदेडनायगांव

नांदेड-हैदराबाद महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल्स आणि दुचाकीचा भीषण अपघात ; देगावचे दोन युवक गंभीर जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक!

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव:- नांदेड हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर 26 मे रोजी दुपारी भीषण अपघाताची घटना घडली असून खाजगी ट्रॅव्हल्स आणि मोटरसायकलच्या धडकेत देगाव ता. नायगाव येथील दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड ते देगलूर मार्गावर धावणारी “निळकंठेश्वर” नावाची खाजगी ट्रॅव्हल्स (क्र. MH 26 BE 0816) ही भरधाव वेगात जात असताना समोरून येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. हा अपघात साई पेट्रोल पंपासमोर घडला. या भीषण धडकेत मोटरसायकलस्वारांना ट्रॅव्हल्सने काही अंतर फरफटत नेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.

धडकेनंतर मोटारसायकल ट्रॅव्हल्सच्या समोर अडकून पडली. अपघात इतका भीषण होता की दुचाकीचे मोठे नुकसान झाले. घटनास्थळी काही काळ एकाचा मृत्यू झाल्याची चर्चा परिसरात सुरू होती. मात्र दोन्ही जखमींना तातडीने नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. दोन्ही युवकांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

या अपघातात देगाव ता.नायगाव येथील अर्जुन उर्फ पप्पू बालाजी विभुते व माधव भुजंगा चिंचलवाड हे गंभीर असून त्याच्यावर उपचार चालू आहेत. त्यापैकी अर्जुन विभुते यांची प्रकृती गंभीर असल्याचे कळते. घटनेची माहिती मिळताच कुंटूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker