ताज्या बातम्यानांदेडबिलोली

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले अट्टल दरोडेखोर पकडण्यात रामतीर्थ पोलिसांना यश

मोरे मनोहर

किनाळा :- दरोड्यासह चोरीच्या अनेक गुन्ह्यात गुन्हेगार असलेले हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील अट्टल दरोडेखोर नांदेड देगलूर राज्य महामार्गावर हत्यारासह दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना त्यांचा रामतीर्थ पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून एक बोलोरो जीप, एक स्विफ्ट डिझायर कार आणि धारदार शस्त्रासह अट्टल दोन दरोडेखोरांना पाठलाग करून पकडण्यात रामतीर्थ व देगलूर पोलिसांना यश आलेअसल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी रामतीर्थ व देगलूर पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले.

पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की नांदेड देगलूर राज्य महामार्गावर देगलूर पोलीस स्टेशनचे सपोनी मारुती मुंडे हे दिनांक 28 ऑक्टोंबर रोजी रात्री दीडच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना त्यांना बोलोरो बिगर नंबरची जीपमध्ये शिकलकरी असताना देगलूर पोलीसांनी सदरील बोलेरो जीप उभा करण्यासाठी प्रयत्न केला मात्र त्यांनी टेम्पो उभा न करता नरसीकडे एक सुसाट वेगाने गेल्याने देगलूर पोलिसांनी सदरील बोलेरो जीप व कार संबथी रामतीर्थ पोलिस स्टेशनचे सपोनी विक्रम हराळे यांना माहिती कळविले सदरील माहिती मिळताच सपोनी विक्रम हराळे यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यासह नरसी येथून देगलूरकडे सदरील बोलेरो जिप व स्विफ्ट डिझायर कारच्या दिशेने येत असताना शंकरनगर जवळ समोरून पोलीस गाडी येत असल्याचे पाहून शंकरनगर पासून डोणगाव जाणाऱ्या रस्त्याकडे सदरील जिप व कार डोणगाव मार्गे सुसाट वेगाने पळवले.

बोलेरो जीपच्य पाठीमागे स्विफ्ट डिझायर कार आणि त्यांच्या मागे पोलिसांची गाडी हे एकमेकांच्या पाठीमागे सुसाट वेगाने धावत असताना डोणगाव जवळ रामतीर्थ पोलिसांनी स्विफ्ट डिझायर कार मधील दोघांना धारदार शस्त्रासह पकडले तर बोलेरो जीप रोडच्या बाजूला येथेच फसल्याने त्यातील असलेले तीन दरोडेखोर मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले.

कार मधील दोन दरोडेखोरांना पकडताच बोलेरो जीप मधील दुसरे दरोडेखोर उसको छोड दो नही तो हम तुम्हे खतम करेंगे असे ओरडत असताना रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनी विक्रम हराळे यांनी देखील न घाबरता रिवाल्वर काढून तुम भागने की कोशिश करोगे तो हम तुम्हे गोलीसे उडादेंगे अशा शब्दात दम देत दोन्ही आरोपींना पकडून पोलीस ठाण्यात आणण्यात यशस्वी झाले.

याप्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात रामतीर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल व्यंकट संभाजी कानुपूरणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी बबलुसिंग ऊर्फ हणमंतसिंग पित्ता हत्यारसिंग टाक रा.इंद्रानगर कळमनुरी जि हिंगोली, करतार सिंग हत्यारसिंग टाक रा.इंद्रानगर कळमनुरी जि हिंगोली, प्रफुल चोखाजी पाईकराव रा.धानोरा ता कळमनुरी जि हिंगोली, सोनु सुभाष सापनर रा.धानोरा ता कळमनुरी जि हिंगोली , सुर्यकांत रामराव कुगावकर रा.माळेगांव ता कळमनुरी जि हिंगोली या अट्टल पाच दरोडेखोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एक बोलेरो जिप, एक स्विफ्ट डिझायर कार सह दोन मोबाईल दोन तलवारी एक चाकू एक लोखंडी राड व एक पाईप असा एकूण दहा लाख 21 हजार 100 रुपयेच्या मुध्येमालासह दोन अट्टल दरोडेखोरांना रामतीर्थ पोलिसांनी अटक केले आहे.

दरोडा व चोरीच्या विविध गुन्ह्यात गुन्हेगार असलेल्या अट्टल दरोडेखोरांना मोठ्या शिताफीने रामतीर्थ व देगलूर येथील सपोनी विक्रम हराळे, पोउपनि नरवाडे, पोहेका कानुपुर्ण, पोहेकॉ चुताडे, पोलीस कत्ते, पोलीस निरीक्षक मारोती मुंडे, पोहेकॉ पवार, पोकॉ मोरे, पोहेकॉ मरगेवाड यांनी केलेल्या कामगिरीबद्दलजिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

विशेष म्हणजे यातील काही दरोडेखोर दरोडाच्या गुन्ह्यात अवघ्या दीड महिन्यापूर्वी परभणी कारागृहातून सजा भोगून सुटलेले असताना नांदेड देगलूर राज्य महामार्गावर पुन्हा दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker