शंकरनगर येथे मद्यपीचा महामार्गावर धिंगाणा एका वाहन चालकासह पोलिसांनाही मारहाण पोलीस काय कारवाई करणार याकडे लक्ष

मोरे मनोहर
किनाळा :- नांदेड देगलूर राज्य महामार्गावर रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शंकरनगर तालुका बिलोली येथे विनाकारण एका ट्रक चालकाशी हुजत घालून वाहतुकीस अडथळा निर्माण करून धिंगाणा करणाऱ्या मद्यपीने एका पोलीस कर्मचाऱ्यांनाही मारहाण करत अर्वाच्य व अश्लील भाषेत शिवीगाळ केले ही घटना दि.8 जून रोजी सकाळी सहाच्या सुमारास घडली असून मद्यपीना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याने याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध काय कारवाई होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
अधिक माहिती अशी की रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हार्दिक शंकरनगर येथे अनेक वेळा भल्या पहाटेपासून ते सायंकाळपर्यंत अनेक मद्यपी विनाकारण अनेक सामान्य नागरिकांना मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने वाद करत असतात परंतु अशा मद्यपीकडे अनेक वेळा पोलीस दुर्लक्ष करत असतात मात्र दिनांक आठ जून रोजी भल्या पहाटे सकाळी सहाच्या सुमारास मद्यपीने देगलूर कडून नांदेड कडे जाणाऱ्या ट्रकच्या समोर जाऊन त्या चालकाशी विनाकारण वाद करत ट्रक ड्रायव्हरला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून महामार्गावर धिंगाणा घातला असता अनेक नागरिक पाहत होते मात्र अशा मद्यपीच्या नादी कोण लागावे या भीतीने त्यांच्यामध्ये कोणीही जात नव्हते यामुळे चालक भयभीत झाला होता.
रामतीर्थ पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर शंकरनगर बसस्थानकाजवळ हा सर्व गोंधळ सुरू असताना याचवेळी रामतीर्थ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी चहा पिण्यासाठी म्हणून सहज सकाळी सकाळी रोडवर आले असता हा मध्य तिचा रोडवर चालकाशी सुरू असलेला गोंधळ सोडवण्यासाठी गेले तेव्हा सदरील मध्यपी ट्रक चालकाला सोडून पोलीस कर्मचाऱ्याशीच हुजत घालत तुम्ही पोलीस वाले आमचे काही वाकडे करू शकत नाही म्हणून अश्लील भाषेत शिवीगाळ करत पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण करून त्यांच्या अंगावरील कपडे फाडले यावेळी मात्र अनेक लोक पोलिसांच्या मदतीला धावून आले तरीही कोणालाही न जुमानता पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण करून जखमी केले हाच मध्यपी या अगोदर देखील काही महिन्यापूर्वी रामतीर्थ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकास देखील लाचा बुक्क्यांनी मारहाण केले होते मात्र त्यांच्याविरुद्ध कसलीही कारवाई करण्यात आली नव्हती.
महामार्गावर दारू पिऊन धिंगाणा घालून एका निष्पक ट्रक चालकासह पोलिसांना मारहाण करणाऱ्या मध्यपीस पकडून पोलिसांनी ठाण्यात घेऊन गेले या प्रकरणी सदरील मध्यपी विरुद्ध काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून हमेशा दारू पिऊन धिंगाणा घालत सर्व सामान्य नागरिकांना मानसिक त्रास देणाऱ्यांना पोलीसांनी वेळीच पावबंद केले असते तर आज हि वेळ कुणावरही आली नसती अशी चर्चा केली जात असुन आतातरी रामतीर्थ पोलिसांनी सामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या मद्यपीचा बंदोबस्त करावा अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून केली जात आहे.



