ताज्या बातम्यानांदेडनायगांव

जिल्हा बँक निवडणूक : नायगावात खा. रवींद्र चव्हाणासह ९२ मतदारांनी बजावला हक्क

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २३ संचालक पदांपैकी ११ संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्यानंतर उर्वरित १२ जागांसाठी रविवारी जिल्ह्यात मतदान पार पडले. नायगाव तालुक्यातील बाजार समिती येथील बूथ क्रमांक ८/१६ वर जिल्हास्तरीय राखीव जागांसाठी १०० पैकी ९२ मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मतदानाचा हक्क बजावला.

नायगाव तालुक्यातील सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून श्रीनिवास चव्हाण हे बिनविरोध संचालक म्हणून निवडून आल्याने तालुक्यातील निवडणुकीतील चुरस कमी झाली असली, तरी जिल्हास्तरीय राखीव जागांसाठी मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी खासदार प्रा. रवींद्र चव्हाण, आमदार राजेश पवार, बिनविरोध निवडून आलेले संचालक श्रीनिवास चव्हाण, शिवराज होटाळकर, राजेश कुंटूरकर यांच्यासह अनेक सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी मतदान केले.सकाळी

मतदारांच्या भेटीगाठी झाल्यानंतर मतदानाला वेग आला. सर्वपक्षीय समन्वयाचे वातावरण असल्याने अनेक प्रमुख नेत्यांनी दिवसभर मतदान केंद्रावर उपस्थित राहून निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवले. विशेषतः श्रीनिवास चव्हाण तसेच खासदारांचे स्वीय सहाय्यक दत्ता येवते यांनी मतदान प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले. संपूर्ण मतदान शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडल्याने प्रशासनानेही समाधान व्यक्त केले.

नायगाव केंद्रावर एकूण १०० मतदारांपैकी ९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये सेवा सहकारी संस्था मतदारसंघात ६७ पैकी ६६, ‘ब’ मतदारसंघात ७ पैकी ५, तर ‘क’ मतदारसंघात २७ पैकी २१ मतदारांनी मतदान केले. दरम्यान, रविवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी दि. २८ जुलै रोजी होणार असून जिल्हा बँकेच्या उर्वरित संचालकांची निवड कोणाच्या बाजूने लागणार याकडे सहकार आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

तर शंभर टक्के मतदान झाले असते…
सेवा सहकारी सेवा गटात एकूण ६७ मतदार आहेत यापैकी दुपारपर्यंत ६६ मतदारांनी मतदान केले. शेतकरी नेते माधवराव पाटील यांचे तब्येतीच्या कारणावरून ते मतदानासाठी येवू शकले नाहीत. शेळगावकरांचे मतदान झाले असते तर सेवा सहकारी गटात शंभर टक्के मतदान झाले असते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker